विकास सुरेश गिते, सिन्नर
लहानपणी आमच्या गल्लीबोळात तसेच घरातील अर्थात कौलारू घरांमध्ये चिमण्यांचा अधिवास हा नित्यनेमाने जाणवत असत असे सांगायचे कारण की आज २० मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. कारण दिवसेंदिवस चिमणी हा पक्षी याची संख्या कमी होताना दिसत आहे. सांगायचे तात्पर्य की घरातील आमच्या कवलारू या छोट्याशा घरांमध्ये सुद्धा माणसांबरोबर चिमणीचा अधिवास हा जाणवत होता. चिमणीचा आवाज आणि आमचे सर्व घर हे दुमदुमून जात होते. कारण लहानपणापासून जिव्हाळ्याचा विषय असलेले म्हणजे चिमणी. हा आमच्या बाल मित्रांचा होता कारण खेळायला पण कुठे गेलो. तर चिमणी ही चिवचिव करताना आमच्या सोबत असेल सर्वांचे बालपण हे अत्यंत खेळण्यात मग्न गेलेल्या आढळते. खेळता खेळता जर एखादी चिमणी कुठे पडलेली दिसली तरी तिला वाचवण्यासाठी आमचे बालमित्र हे पाणी घेऊन मैल दरमजल येत होते. या चिमुकल्या पक्षीला सलाईनच्या नळ्या द्वारे पाणी पाजले व शुद्धीवर आल्यानंतर तिला मुक्त विहार करण्यासाठी आम्ही तिला सोडत असो.
उन्हाळ्याचे दिवस पण खूप जाणवत असत लहानपणी आत्ताच्या सारखे घरापाशी खेळणे नव्हते. तर मनसोक्त विहार व खेळण्यात आमचे दिवस जात होता. पशुपक्षी हेच आमचे सवंगडी होते. आताच्या धावपळीच्या युगात तसेच लहान मुलांच्या अभ्यासाच्या ओझ्याने आपल्या घरातील मंडळी तसेच मुले चिमणी या पशुपक्ष्यांना विसरून गेलेले आढळते. लहानपणी आम्हाला एकच पक्षी माहिती असलेला आम्हाला जाणवतो. तो म्हणजे चिमणी कावळा. चिमणीचा चिवचिवाट मनाला व अंतकरणला छेदून जात असे. आपण व माझ्या बालमित्रांनी केलेल्या पशुपक्षी या प्राण्यांवर भूतदया केलेली आढळते. याची पुनरावृत्ती म्हणून मी माझ्या मुलाला अर्थात समर्थाला पशुपक्ष्यांना जीव लावण्याची हातोटी दिली कारण पशुपक्षी आहे तर आपणही सुरक्षित आहोत. असे मला कायमस्वरूपी वाटते. पशु पक्ष्यांच्या किलबिलाटाने आपला सर्वांचा दिवस आनंदाने जातो. त्यामुळे एक आपल्या शरीरात नवचैतन्य निर्मिती होण्यास मदत होते. आत्ताच्या हल्लीच्या युगात सर्वीकडे बंगल्यांची जंगल झालेले आढळते. त्यामुळे चिमणी या पक्षाला राहण्यासाठी आसरा मिळताना दिसत नाही. अशावेळेस आपण या चिमणी या पक्षासाठी कृत्रिम घरटे व झाडांवर पुठ्ठ्याचे घर जरी बनवले तरी पुरेसे आहे. त्यामुळे चिमणी हा पक्षी नक्की वाचेल व आपल्या पुढील पिढीला चिमणी या पक्षाचा आदिवास हा मिळेल याची शाश्वती नक्की देतो. तर आजच आपण निर्धार करूया चिमणी या पक्षाला वाचूया त्यासाठी या उन्हाळ्याच्या अगोदर या पशुपक्ष्यांसाठी अन्न पाण्याची सोय करू या व पशुपक्ष्यांवर भूत दया करूया हीच प्रार्थना,
घराच्या शाळेच्या कौलामध्ये भिडलेला गवताचा मजबूत असा खोपा तुम्हांला आठवतो का ? अंगणामध्ये वाळवत घातलेल्या धान्यावर सगळ्यांच्या नजरा चुकून दाणे चोरणारी चिमणी आपण शेवटची तुम्ही कधी बघितली ? जन्माला आल्यानंतर मानलेली सर्वात पहिली बहीण… चिऊताई! आपल्या शाळेच्या पुस्तकातली लाडकी चिऊताई हरवली कुठे ? याचा विचार आपल्या डोक्यात येतच नाही ? गेल्या काही वर्षांच्या काळात आपल्या घरात व अंगणात दाणे टिपणारी चिमणी अचानक जी भूर उडून गेली ती ती आज पर्यंत आलीच नाही ….! जंगल तोडून उभ्या राहिलेल्या काँक्रीटच्या इमारती ती बिचारी चिमणी कुठे राहणार ? हल्ली तिला घर उरलेच कुठे ? हळूहळू आता ती सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे समजा!
वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे आहे आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांची अनुपलब्धता अन्नाची* *अनुपलब्धता आणि शहरातले वाढते प्रदूषण यासारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे मोबाईल चे टावर त्यांची किरणे यामुळे त्यांच्या संख्येवर दिवसेंदिवस परिणाम होत चाललेला आहे. आज हे सांगण्याचे कारण म्हणजे आज २० मार्च म्हणजेच चिमणी दिवस. नोव्हेंबर २००९ पासून चिमणी चिमणी वाचवण्यासाठी मोहीम सुरू झाली. चिमण्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी २०१० रोजी पहिल्यांदा दिल्ली येथे जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला.
चिमणी (हाउस स्पॅरो) आणि रान चिमणी (यलो थ्रोटेड चिमणी) अशा दोन प्रकारच्या चिमण्या पूर्ण जगभरात आढळतात.चिमणी हा पक्षी हिमालयाच्या २००० मीतर उंचीपर्यंत, तसेच हा पक्षी भारतातही सगळीकडे आढळतो.तुम्हांला माहीतच असेल की आज काल च्या चिमण्या आपण टाकून दिलेले अन्नधान्य, आजूबाजूच्या परिसरातील कीटक तसेच शेतातील झाडावरील कीटक, असे सर्व प्रकारचे खाद्य चिऊताई खात असते त्या मुळे ती आपल्याला व शेतकऱ्यांना सुद्धा मदत करत असते. नदीपात्रात पडत असलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे चिमण्यांना अन्न शोधण्यासाठी अडचण निर्माण होत आहे जंगली नष्ट करून इमारती उभारल्या मुळे नैसर्गिक वातावरण बिघडत चालले आहे, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतातील कीटकनाशकांचा बेसुमार वापर यामुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे. पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करणे हे मोठे आव्हान होऊन बसले आहे, पशुपक्षी संवर्धनाची समस्या निर्माण झाली आहे! आणि त्यासाठी आपण चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी पर्यावरण पुरक पर्यंत केले पाहिजे ! पशु पक्षांनी तर त्यांच्या निवाऱ्याची जागा आपल्याला दिली आहे, परंतु आता त्यांच्या निवाऱ्याच काय ? त्यांच्यासाठी आता आपल्याला काहीतरी करण्याची वेळ आली आहे! आठवूनी चिउ-काऊचा घास घेऊ चिमण्यांच्या संवर्धनाचा वास आपण काही तरी करण्याची हीच वेळ आहे आपण सर्वांनी मिळून हे पक्षी नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत व निसर्ग सौंदर्य टिकवण्यासाठी हातभार लावला पाहिजे . सकाळी सकाळी आपले दार उघडल्यावर चिवचिव करणारी चिऊताई आता शहरी व ग्रामीण भागातून सुद्धा हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे चिमणी संवर्धनाची जबाबदारी आपल्याला घेऊया, त्यांची संख्या पुन्हा वाढण्यासाठी आवश्यक तेवढे प्रयत्न करूया.
चिमणी वाचवण्यासाठी काय करावे :
पक्षी संवर्धन आणि निसर्ग संवर्धन करायला हवे !
त्यासाठी आपण चिमणी व इतरही पक्षी वाचवण्यासाठी जनजागृती करायला पाहिजे !
त्यांच्या अन्नसाखळी यांची पर्यायी ओळख करून जनजागृती आणि संवर्धन करणे .
चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे
शक्य असल्यास घराभोवती जास्तीत जास्त झाडे लावा व चिमणी वाचवा
चिमणीला घरटे बांधण्यासाठी विविध गोष्टी उपलब्ध करून देणे
आपल्या घराभोवती किंवा बाल्कनी मध्ये चिमण्यांसाठी पाणी ठेवणे ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जणांनी करायला हव्यात!
माणसाच्या बदललेल्या खाण्याच्या सवयी वाढते आधुनिकीकरण या सर्व गोष्टींमुळे चिमणीच नव्हे तर इतरही पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत , चला तर मग आपण एक संकल्प करूया आणि चिमणीला वाचू या.
शेवटी एवढेच म्हणेन
चिऊताईचा चिवचिवाट पुन्हा ऐकावासा वाटतो ना?
चला पर्यावरण रक्षणाचा
लढा अधिक भक्कम करू या…
पक्षी वाचूया – निसर्गाचे सौंदर्य वाढवूया !