शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारत भेटीने अचंबित झालो, मुंबईची संस्कृती मुंबईत राहून अनुभवायची… चिली राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली इच्छा

by India Darpan
एप्रिल 4, 2025 | 7:14 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
भारत भेटीने अचंबित झालो असल्याचे चिली राष्ट्राध्यक्षांची भावना 1 1024x682 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भारताबद्दल फार पूर्वीपासून कुतूहल होते व मुंबईबद्दल अनेक पुस्तकांच्या माध्यमातून वाचले होते. प्रत्यक्ष होत असलेल्या भारत भेटीमुळे आपण अक्षरशः अचंबित झालो आहोत. मात्र येथील संस्कृती आणि लोकजीवन वरवर न पाहता लोकांमध्ये राहून अनुभवायचे आहे, असे उद्गार सध्या भारत भेटीवर असलेले चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फाँट यांनी आज येथे काढले.

महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी (दि.३ एप्रिल) 39 वर्षीय राष्ट्राध्यक्ष बोरिक यांचे राजभवन येथे स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते.
नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोबत चिलीचा ‘सामायिक आर्थिक भागीदारी करार’ झाला असून व्यापार व वाणिज्य याशिवाय आपला देश भारताशी कृषी उद्योग, संस्कृती, महत्त्वपूर्ण खनिज आणि विशेष करून चित्रपट निर्मितीमध्ये सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचे राष्ट्राध्यक्ष बोरिक यांनी यावेळी राज्यपालांना सांगितले.

चिलीशी व्यापार वाढल्यास भारताला चिली देशाचा दक्षिण अमेरिकी देशांसाठी प्रवेशद्वार म्हणून उपयोग करता येईल, असे राष्ट्राध्यक्ष बोरिक यांनी सांगितले.‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण स्पेन येथे झाल्यानंतर त्या देशातील पर्यटनाला मोठी चालना मिळाली होती, असे नमूद करून भारतीय चित्रपट उद्योगाने चिली सोबत चित्रपट सहनिर्मिती करावी आणि चिली येथे चित्रपटांचे चित्रीकरण करावे अशी अपेक्षा राष्ट्राध्यक्षांनी यावेळी व्यक्त केली.

चिली येथे चित्रीकरणासाठी फार सुंदर ठिकाणे उपलब्ध असून त्यामुळे चिलीतील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी बोरिक यांनी राज्यपालांकडून राज्याच्या तसेच मुंबईच्या नागरी समस्या समजून घेतल्या तसेच त्यावर शासनातर्फे केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.
चिलीच्या राष्ट्राध्यक्षांचे राज्यात स्वागत करताना राज्यपालांनी पर्यटन व व्यापार यांच्या माध्यमातूनच उभय देशांमधील संबंध अधिक दृढ होतील असे सांगितले.

सध्या मुंबई आणि चिली मध्ये थेट विमानसेवा उपलब्ध नसली तरी देखील नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ विमान तयार झाल्यानंतर उभय देशांमध्ये थेट विमान सेवा सुरू होण्याबद्दल चर्चा करता येईल असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी चिलीचे परराष्ट्र मंत्री अल्बर्टो व्हॅन क्लेव्हरेन, चिलीचे भारतातील राजदूत जुआन अँगुलो, चिलीच्या सांस्कृतिक कार्य मंत्री कॅरोलिना अरेडोंडो व राष्ट्राध्यक्षांचे आंतरराष्ट्रीय व्यवहार सल्लागार कार्लोस फिगुएटो हे देखील उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रेल्वे प्रवासात मोबाईल चोरीला गेला तर या अ‍ॅपवर करा तक्रार….

Next Post

हॅास्पिटलने १० लाख मागितले, मग, दुस-या दवाखान्यात जुळ्यांचा जन्म, पण, आईने जीव सोडला…पुण्यातील धक्कादायक घटना

Next Post
Untitled 4

हॅास्पिटलने १० लाख मागितले, मग, दुस-या दवाखान्यात जुळ्यांचा जन्म, पण, आईने जीव सोडला…पुण्यातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011