गाझियाबाद (उत्तर प्रदेश ) – पोलीस तपासात खूप प्रयत्न करूनही काही वेळा गुन्हा उघड होत नाही. मात्र एखाद्या अचानक घडलेल्या गोष्टींमधून अखेर गुन्हेगार समोर येऊ शकतो. आपल्या पित्याचा खून झाल्याचे मुलाने उघड केल्याने उत्तर प्रदेशातील साहिबाबाद रेल्वे स्थानकासमोरील नाल्यात एक मृतदेह सापडल्याच्या प्रकरणात सध्या एक नवीन वळण मिळाले आहे. या प्रकरणी मृताच्या भावाने त्याची मेहुणी, तिचा प्रियकर आणि मृताच्या मेहुण्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृताच्या मुलांनी नातेवाईकांना सांगितले होते की, त्याच्या आईने वडिलांना अन्नात औषध मिसळून भूल दिली होती. त्यानंतर, त्याचा दोरीने गळा दाबून हत्या केली. वास्तविक जेव्हा पोलिसांना मृतदेह सापडला तेव्हा पोलिसांनी त्या महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु महिलेने मृतदेह ओळखण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी बेवारस समजून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
पोलीसांनी सांगितले की, साहिबाबाद गावात अर्जुन यादव (३२ ) एका कारखान्यातील मेकॅनिक कामगार असून तो पत्नी आणि तीन मुलांसह भाड्याच्या घरात राहत होता. मात्र २१ फेब्रुवारीला बेपत्ता झाल्यानंतर त्याचा भाऊ आणि पत्नीने पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. अर्जुनचा भाऊ लक्ष्मण यादव याने तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या भावाचा शोध न लागल्याने अर्जुनची पत्नी आशा ही तीन मुलांसह बलिया जिल्ह्यातील टोला सिवान गावात गेली होती. यानंतर आशा ही मुलांना सोडून दुसरा भाऊ रजनीशसोबत घर सोडून गेली.
त्याचप्रमाणे घरी मुलांनी सांगितले की, आईने त्यांच्या वडिलांना जेवणात एक औषध मिसळल्यानंतर त्यानंतर त्याचा भाऊ रजनीश आणि कथित प्रियकर बब्बू खान यांनी आपल्या वडिलांची हत्या करण्यात आली. यानंतर मृतदेह साहिबाबाद येथील नाल्यात फेकून ते पळून लोक गेले. मात्र मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटविण्यावेळी आशा यांनी मुलांवर दबाव आणला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.