मुंबई – आपण दुचाकी वाहन किंवा सायकलवर हेल्मेट घालतो. पण, घरातही हेल्मेट घालण्याचे सांगितले तर तुम्हाला नवलच वाटेल ना. त्यातही लहान मुलांना हेल्मेट सक्ती केली तर तुमचा अभिप्राय काय असेल. पण, हे सध्या एका देशात घडते आहे. तेथे पालक आपल्या लहान मुलांना घरातच हेल्मेट घालत आहेत.
बालपणापासूनच मुलांवर सुसंस्कार व्हावेत म्हणून आपल्या देशात पालक नेहमीच काळजी घेत असतात. त्यांना शिस्त लागावी सार्वजनिक जीवनात वावरतांना मुलांनी ही शिस्त पालन करावी, सामाजिक नियमांचे पालन व्हावे, यासाठी पालक नेहमीच धडपड करीत असतात. केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांत मुलांवर सुसंस्कार व्हावेत, म्हणून पालक काळजी घेतात. त्यामध्ये वेगवेगळी कारणे देखील असू शकतात. त्यापैकीच एक प्रकार म्हणजे चीन मध्ये मुलांना सार्वजनिक ठिकाणी वाहने चालवताना त्रास होऊ नये म्हणून मुले घरात खेळताना हेल्मेट घालण्याचा सराव करण्यात येतो. असे आपल्याला वाटेल. परंतु याचे मूळ कारण वेगळेच आहे, मुलांचे डोके लहान आकाराचे आणि गोल राहावे म्हणून हेल्मेट करण्यात येते.
मुलांना सुरुवातीपासूनच हेल्मेटची सवय लागावी, ज्याचा त्यांना नंतर खूप उपयोग होईल याची काळजी त्यांचे पालक घेतात. असे वाटू शकते. परंतु चीनमध्ये आजकाल पालकांच्या या अजब कारनाम्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे. चीनच्या अनेक शहरांमध्ये मुले हेल्मेट घातलेली दिसतात. तसेच त्यांच्या घरातही ते हेल्मेट घालतात. परंतु हे सर्व मुलं स्वत:च्या इच्छेने करत नसून पालक जाणीवपूर्वक आणि जबरदस्ती करत आहेत.
कारण या हेल्मेटमुळे मुलांचे डोके गोल गोल राहतील, असे या मुलांच्या पालकांना वाटते. यामुळे ते सुंदर दिसतील, त्यांचा असा विश्वास आहे की दैनंदिन जीवनात प्रत्येकजण कपडे घालतो, टोपी घालतो आणि इतर कपडे घालतो, त्याचप्रमाणे मुलांनी हेल्मेट घालावे. काहीवेळा मुलांना ते विचित्र वाटते परंतु ते त्यांच्या मुलांना ते नक्कीच घालतात. एका अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, चीनमध्ये मुलांमध्ये हेल्मेट घालणे जवळजवळ एक ट्रेंड बनले आहे. याचा मोठा फायदा कंपन्यांना होत आहे. लहान मुलांच्या मऊ कवटीला आकार देण्यासाठी ही हेल्मेट्स कंपन्यांकडून खास बनवली जात आहेत. मात्र त्यामुळे मुलाला किती त्रास होतो हे सध्या अहवालात सांगण्यात आलेले नाही.