शुक्रवार, मे 30, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी मोक्याच्या लष्करी तळांना दिली भेट…

by India Darpan
मे 20, 2025 | 7:02 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 38

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -सशस्त्र दलांचे मनोबल वाढवण्यासाठी, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी १९ मे रोजी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या सुरतगड लष्करी तळ आणि नलिया हवाई दल तळाला भेट दिली. बदलत्या सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी परिचालन तत्परता आणि काळानुरूप बदल घडविण्याचे महत्त्व अधोरेखित करत संरक्षण दल प्रमुखांनी सैनिकांशी संवाद साधला.

संरक्षण दल प्रमुखांनी कर्मचाऱ्यांची परिचालन सज्जता आणि उच्च मनोबलाचे कौतुक केले तसेच भविष्यातील धोक्यांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्याच्या त्यांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला.

त्यांच्यासमवेत दक्षिण पश्चिम कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल मनजिंदर सिंग आणि दक्षिण पश्चिम हवाई कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल नागेश कपूर यावेळी उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये सैनिकांनी दाखवलेल्या अनुकरणीय धैर्याची दखल घेणारी संरक्षण दल प्रमुखांची ही भेट गौरवान्वीत करणारी होती. ऑपरेशन सिंदुरमध्ये तैनात केलेल्या नवीनतम आणि मजबूत हवाई संरक्षण प्रणालींबद्दल जनरल अनिल चौहान यांना माहिती देण्यात आली. भेटीदरम्यान जनरल चौहान यांनी वरिष्ठ लष्करी कमांडर्सशी धोरणात्मक चर्चा देखील केली.

जनरल चौहान यांनी ऑपरेशनच्या सक्रिय टप्प्यात सैनिकांच्या असामान्य शौर्याचे आणि निपुणतेचे कौतुक केले. सुरक्षेचे उल्लंघन करण्याच्या शत्रूच्या अनेक प्रयत्नांना निष्फळ ठरविण्याच्या भारतीय सैनिकांच्या समर्पण, धैर्य आणि दृढ वचनबद्धतेवर जनरल चौहान यांनी प्रकाश टाकला. आपले सैनिक लष्करी कार्य निपुणतेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करतात, असे ते म्हणाले. कोणत्याही आव्हानाला निर्णायक क्षमतेने उत्तर देण्यासाठी सदैव तयार राहण्याच्या गरजेवर जनरल चौहान यांनी भर दिला.

संरक्षण दल प्रमुखांनी आपल्या भाषणात आंतरसेवा समन्वयाची प्रशंसा केली. स्थानिक नागरी प्रशासनाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल जनरल चौहान यांनी त्यांचे कौतुक केले आणि अशा गंभीर परिस्थितीत लष्करी-नागरी समन्वयाचे महत्त्वही अधोरेखित केले.

या भेटीमुळे देशाच्या सशस्त्र दलांबद्दलच्या नागरिकांच्या कृतज्ञतेची पुष्टी झाली, तसेच एकता, सज्जता आणि अतुट राष्ट्रीय वचनबद्धतेचा संदेश अधिक बळकट झाला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुन्हेगाराला वेगाने पकडण्यासाठी नवीन ई-झिरो एफआयआर उपक्रम सुरू…

Next Post

महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक…नियमांचे पालन न केल्यास इतका होणार दंड

Next Post
Maha Gov logo 07 1 1024x512 1

महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक…नियमांचे पालन न केल्यास इतका होणार दंड

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी विचारपूर्वक गुंतवणूक करा, जाणून घ्या, शनिवार, ३१ मेचे राशिभविष्य

मे 30, 2025
J

राष्ट्रपतींच्या हस्ते जळगावच्या सुजाता बागुल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

मे 30, 2025
IMG 20250530 WA0299 e1748613490983

नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत ‘इंडस्ट्रीयल मिट’

मे 30, 2025
IMG 20250530 WA0311 e1748613086393

अखेर अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिला हा निर्णय….

मे 30, 2025
kvk ycmou 1

मुक्त विद्यापीठात मधमाशीच्या सहाय्याने सेंद्रिय पद्धतीने वाढवलेला ‘मधुर’ केसर आंबा वाजवी दरात उपलब्ध…

मे 30, 2025
cricket

महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी नाशिकच्या या दोन पंचाची निवड…

मे 30, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011