अमृतसर – पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंग चेन्नी यांनी एका नवविवाहित दाम्पत्याला सुखद धक्का दिला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या पंजाबमध्ये विशेष चर्चेचा ठरला आहे. भटिंडा दौऱ्यावर असलेल्या चेन्नी यांनी नवविवाहित दाम्पत्याला पाहून तातडीने वाहन थांबविण्याचे सांगितले. त्यानुसार क्षणार्धात मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा थांबला. आपल्या वाहनातून मुख्यमंत्री उतरले आणि तडक नव दाम्पत्याच्या दिशेने गेले. त्यांनी दाम्पत्याला सुखद धक्का देत शुभेच्छा दिल्या. हा सर्व प्रकार पाहून नवदाम्पत्य हरखून गेले. मुख्यमंत्री प्रत्यक्ष आपल्याला शुभेच्छा देतील याची कुठलाही विचार त्यांनी केला नव्हता. मात्र, या क्षणामुळे प्रचंड आनंदित झाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. बघा हा व्हायरल व्हिडिओ