मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सलग दुसऱ्या दिवशी कोकण दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळे कोकणात प्रचंड हानी झाली आहे. महाड तालुक्यातील तळीये गावच दरडीखाली दाबले गेले. या ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांनी काल भेट घेऊन त्यांना धीर दिला. आज मुख्यमंत्री चिपळूण दैऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी व्यावसायिकांसह नागरिकांशी संवाद साधला. ‘तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी चिपळूणमधील व्यावसायिक व दुकानदारांना धीर दिला. याप्रसंगी पालकमंत्री भास्कर जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. किती आणि कसे नुकसान घेतले आहे याचा अंदाज घेतला. प्रशासनाने तातडीने नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम हाती घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्य सरकार मदतीबाबत लवकरच ठोस निर्णय घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1419214021014691842