मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज बीकेसी मैदानावर झाली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची ही पहिलीच जाहीर सभा होती. त्यामुळे ते काय बोलणार, कोणाला लक्ष्य करणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्यांनी या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदींवर जोरदार टीका केली.
उद्धव यांच्या सभेतील महत्त्वाचे मुद्दे असे
– मुन्नाभाई चित्रपटात कस त्याला गांधीजी दिसतात तस एकाला बाळासाहेब दिसतात, भगवी शाल घालुन फिरतो. म्हंटल अरे तो मुन्नाभाई तर लोकांच भल तरी करतो. त्यात शेवटी कळत की केमिकल लोचा झाला आहे, हे तसंच आहे.
– देवेंद्रजी तुम्ही एक संदर्भ गाळलात, मुफ्तींनी जेव्हा तुमच्या मंत्र्यांसोबत पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते म्हणाले होते, पाकिस्तान हुर्रियत आणि दहशतवाद्यांना धन्यवाद देतो.
– आज स्टार्ट अप मध्ये महाराष्ट्र संपूर्ण देशात नंबर एक वर आहे.
– देवेंद्रजी, बाबरी पाडली तेव्हा तुमचं वय काय होतं? ती काय शाळेची पिकनिक होती? आज मी तुम्हाला विचारतो, तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलंत?
– टिनपाटांना जनतेच्या पैशावर सुरक्षा कशासाठी? तिकडे कश्मीरी पंडित धोक्यात आहेत, त्यांची सुरक्षा करायची नाही. या भोक पडलेल्या टीनपाटांना वाय आणि झेड सुरक्षा द्यायची कशाला?
– अतिरेकी महसूल कार्यालयात येऊन गोळ्या चालवून जात आहेत…मारायला येण्याच्या आत त्यांना मारले गेले पाहिजेत. काश्मिरी पंडीत म्हणत आहेत, आमचा बळीचा बकरा केला जात आहे. यावर का बोलत नाहीत? काश्मीर फाईल्सचा हा पुढील अध्याय का?
– प्रमोद महाजन म्हाळगी प्रबोधिनीची जबाबदारी पार पाडत. मी गेलो, पाहिलं आणि विचारलं इथे काय करता? त्यांनी सांगितलं की आम्ही इकडे कार्यकर्ते घडवतो. मग आता जे आहेत ते कोण? प्रबोधिनीत संस्कार घेतलेले सहस्त्रबुद्धेंसारखे गेले कुठे?
– 1973 साली अटलबिहारी वाजपेयी बैलगाडीवरुन संसदेत गेले होते… केवळ सात पैसे दर वाढले होते. मग ही संवेदनशील भाजप गेली कुठे?
– आमची पंचवीस वर्षे युतीमध्ये सडली.
– ज्या ज्या वेळी मुंबई वरती आपत्ती येते, तेव्हा धावून जाणार, माझा शिवसैनिक असतो.
– ते अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन आणत आहेत… ती कुणाला हवी आहे? हा मुंबई तोडण्याचा डाव आहे. मुंबई स्वतंत्र करणार म्हणजे काय करणार? मुंबई काय पारतंत्रात आहे?
– स्लीप ऑफ टंग म्हणून काही मुद्दे सोडता येणार नाहीत, 1 मे रोजी देवेंद्रजी बोलुन गेले, त्यांच्या मालकाची जी इच्छा आहे ती की मुंबई आम्हीं स्वतंत्र करणार. तुमच्यासकट तुमच्या मालकाच्या सतराशे साठ पिढ्या आल्या तरी हे शक्य नाही.
– मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली आहे.
– घोड्याच्या आवेशात जी “गाढवं” आमच्या सोबत होते, त्यांना लाथ मारून अडीच वर्षांपूर्वी बाहेर केले…
– लढायचं असेल तर सरळ या…
– पुरातत्व विभाग औरंगजेबाचं थडगं बघतोय तिकडे बोंबला.
– आम्ही केलं ते उघड केलं. आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर पाप आणि तुमची सकाळची शपथ काय होती? जर ती यशस्वी झाली असती तर आज नवाब मलिकांसोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना?
– आम्ही संयम बाळगतो म्हणजे आम्ही नामर्दाची औलाद नाही.
– छत्रपतींच्या मातृभाषेस अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकत नाहीत, असे करंटे सरकार तिथे बसलं आहे. पुरातत्व खात तेच जे औरंगजेबाची कबर राखतं, तिथे कबर राखतात आणि मंदीरांच्या जीर्णोद्धारास नकार देतात. देवेंद्रजी तिकडे जाऊन विरोध करा, असे अनेक प्रकल्प आहेत जिथे केंद्राने अडवणूक केली आहे.
शिवसंपर्क अभियान | जाहीर सभा | बी. के. सी. मैदान | मुंबई – LIVE https://t.co/Gtmp9RAbTO
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) May 14, 2022