मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेमध्ये मोठे वादळ आल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान देणे सुरू केले आहे. त्यामुळेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या चालू घडामोडींबाबत ते जनतेशी बोलत आहेत. जाणकारांचे म्हणणे आहे की, हा संवाद म्हणजे जनतेचा निरोप घेणारे भाषण असणार आहे. त्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सायंकाळी साडेपाच वाजता जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत आहेत. बघा त्याचे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/MahaDGIPR/status/1539581190596083712?s=20&t=u4simUNJ_yj7FDfRTmu6NQ
chief minister uddhav thackrey facebook live maharashtra political crisis