मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अचानक राज्यातील जनतेशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणी घेण्याचा निकाल दिला. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज निरोपाचे भाषण केले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनतेशी संवाद – LIVE https://t.co/ogsYKE1vvk
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 29, 2022
उद्धव ठाकरे म्हणाले की,
– तुमच्या आशिर्वादाने पुढील वाटचाल सुरू राहील
– आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे केवळ ४ मंत्री होते
– औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केल्याचा आनंद
– चांगले काम करण्याला दृष्ट लागली असे म्हणावे लागेल
– राज्यपालांना धन्यवाद. लोकशाहीचा मान राखला. २४ तासाच्या आत संधी दिली
– राज्यपालांनी १२ आमदारांच्या नावांना अद्यापही मंजूरी दिली नाही
– अशोक चव्हाण म्हणाले, आमच्यावर राग आहे तर त्यांना बोलवा आम्ही बाहेरुन पाठिंबा देतो.
माणसं मोठी झाली आणि ज्यांनी मोठं केलं त्यांनाच विसरायला लागली.
-शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) June 29, 2022
– शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे मनापासून आभार
– बंडखोर आमदारांना मनापासून विनंती, अजूनही परत या. तुमचे म्हणणे सांगा.
– सूरत, गुवाहाटीमधून बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष या
– तुम्ही एवढी माणुसकी विसरलात का,
– डोकी मोजण्यासाठी वापरायची का. लोकशाहीचं हे दुर्दैव
– मला खेळंच खेळायचा नाहीय
– शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरुन खेचण्याचे पुण्य मिळणार आहे
– मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत जराही नाही
मी पुन्हा शिवसेना भवनमध्ये बसायला सुरुवात करणार आहे. माझ्या शिवसैनिकांना भेटणार आहे.
शिवसैनिकांपासून ठाकरे कुटुंबियांना कोणीच हिरावून घेऊ शकत नाही..
– शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) June 29, 2022
– गुळाला चिकटणाऱ्या मुंगळ्यासारखा मी नाही
– मुख्यमंत्री पदाचा त्याग करीत आहे
– मी घाबरणारा नाही
– शिवसैनिकांच्या सुरक्षेसाठी मी हा निर्णय घेतो आहे. उद्या कुणालाही अडवू नका. त्यांना जे काय करायचं ते करु द्या.
– मला आशिर्वाद प्रेमाचा, गोडवा हवा आहे.
ज्यांना शिवसेना, शिवसेनाप्रमुखांनी मोठं केलं..
त्यांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचे पुण्य त्यांच्या पदरात पडत असेल तर ते पडू द्या.. यांच्या वर विश्वास ठेवला हे पाप माझं आहे..-शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) June 29, 2022
– महाराष्ट्रात कुठलीही दंगल घडली नाही, घडू दिली नाही. आपण सर्वांनी साथ दिली
– आज जे घडतंय ते अनपेक्षित. मी आलो अनपेक्षितपणे, जातोय अनपेक्षितपणाने
– मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देतोय. यापुढे केवळ शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून काम करणार
Chief Minister Uddhav Thackeray Resign today