मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अचानक राज्यातील जनतेशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणी घेण्याचा निकाल दिला. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज निरोपाचे भाषण केले.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1542176665719037952?s=20&t=xJZ2BVlgsMoP9NmUGlWmyA
उद्धव ठाकरे म्हणाले की,
– तुमच्या आशिर्वादाने पुढील वाटचाल सुरू राहील
– आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे केवळ ४ मंत्री होते
– औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केल्याचा आनंद
– चांगले काम करण्याला दृष्ट लागली असे म्हणावे लागेल
– राज्यपालांना धन्यवाद. लोकशाहीचा मान राखला. २४ तासाच्या आत संधी दिली
– राज्यपालांनी १२ आमदारांच्या नावांना अद्यापही मंजूरी दिली नाही
– अशोक चव्हाण म्हणाले, आमच्यावर राग आहे तर त्यांना बोलवा आम्ही बाहेरुन पाठिंबा देतो.
– शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे मनापासून आभार
– बंडखोर आमदारांना मनापासून विनंती, अजूनही परत या. तुमचे म्हणणे सांगा.
– सूरत, गुवाहाटीमधून बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष या
– तुम्ही एवढी माणुसकी विसरलात का,
– डोकी मोजण्यासाठी वापरायची का. लोकशाहीचं हे दुर्दैव
– मला खेळंच खेळायचा नाहीय
– शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरुन खेचण्याचे पुण्य मिळणार आहे
– मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत जराही नाही
– गुळाला चिकटणाऱ्या मुंगळ्यासारखा मी नाही
– मुख्यमंत्री पदाचा त्याग करीत आहे
– मी घाबरणारा नाही
– शिवसैनिकांच्या सुरक्षेसाठी मी हा निर्णय घेतो आहे. उद्या कुणालाही अडवू नका. त्यांना जे काय करायचं ते करु द्या.
– मला आशिर्वाद प्रेमाचा, गोडवा हवा आहे.
– महाराष्ट्रात कुठलीही दंगल घडली नाही, घडू दिली नाही. आपण सर्वांनी साथ दिली
– आज जे घडतंय ते अनपेक्षित. मी आलो अनपेक्षितपणे, जातोय अनपेक्षितपणाने
– मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देतोय. यापुढे केवळ शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून काम करणार
Chief Minister Uddhav Thackeray Resign today