मुंबई – प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्व्हेक्षणातून ४९ टक्के मते मिळवणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. त्यांच्यापाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना ४४ टक्के मते मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत असून त्यांना ४० टक्के मते मिळाली आहेत. प्रश्नमने आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्यात ही माहिती आहे.
प्रश्नमकडून देशातील १३ राज्ये निवडली. त्यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. एकीकडे लोकप्रिय मुख्यमंत्री सर्व्हे करत असतांना दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याबाबत ६० टक्के मतदारांनी त्यांची कामगिरी खराब असल्याचे म्हटले आहे. तर केवळ १५ टक्के लोकांनीच त्यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांच्याबाबत सर्वाधिक नकारात्मक मते आहे.
या १३ राज्यातून १७ हजार ५०० जणांनी आपले मत नोंदवले. या सर्व्हेक्षणात तीन प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातून ही मते नोंदवण्यात आली.
१. मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब असून ते पुन्हा मु्ख्यमंत्री म्हणून नको
२. मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असली तरी पुन्हा त्यांना मत देणार नाही
३. मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असून, पुन्हा हेच मुख्यमंत्री हवे