रांची (छत्तीसगड) – भारतीय संस्कृतीत विविध प्रकारच्या रुढी आणि परंपरा आहेत. मान्यतेवर सारे काही अवलंबून असते. आज उत्तर भारतात अनेक ठिकाणी गोवर्धन पुजा केली जाते. दुर्ग येथील गोवर्धन पुजा अतिशय प्रसिद्ध आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही या पुजेमध्ये सहभाग घेतला. विशेष म्हणजे, या पुजेवेळी आपल्या हातावर मांत्रिकाकडून फडके मारुन घेण्याची प्रथा आहे. आणि मुख्यमंत्री बघेल यांनी या प्रथेमध्ये सहभाग घेतला. त्यामुळेच यापर्संगाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1456521975254323200