मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यासपीठावर होते. विशेष म्हणजे शिंदे गटाने दाखल केलेली याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. घटनात्मक पेच निर्माण झालेली ही याचिका आहे. अशा स्थितीत शिंदे यांनी सरन्यायाधीशांसोबत व्यासपीठावर असणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाचील यांनीही प्रतिक्रीया दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा आज सायंकाळी मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्याच्या अर्थसंकल्पात सध्या एक टक्केपेक्षा थोडी कमी तरतूद विधि व न्यायसाठी असून ती वाढवून एक टक्क्यांपर्यंत आणण्याचा देखील मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी जास्तीची जागा देण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे व लवकरच त्याबाबतीत निर्णय घेतला जाईल हे सांगितले.
हॉटेल ताज पॅलेसच्या क्रिस्टल हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय विधि व न्यायमंत्री किरेन रिजिजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, अमिता उदय लळीत, झुमा दत्ता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांची उपस्थिती होती. मुंबई उच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती उपस्थित होते. यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते सरन्यायाधीश उदय लळीत यांचा हृद्य सत्कार करण्यात आला तसेच संस्कृतमधील गौरव पत्र देण्यात आले. तर झुमा दत्ता यांच्या हस्ते अमिता उदय लळीत यांना मानचिन्ह देण्यात आले.
मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश एकाच व्यासपीठावर असल्याने जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाटील म्हणाले की, मा. सर्वोच्य न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्य न्यायालयाचे मा. सरन्यायाधीश यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसणे, हे संकेतांना धरून नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1568812526992871426?s=20&t=1OxEW10twHT5vcpFYGCDUw
Chief Minister Shinde and CJI Lalit on Same Dias
NCP Jayant Patil Criticize