नाशिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या नाशिक दौ-यावर येत असून ते २९ जुलै रोजी मालेगाव येथे मुक्काम करणार आहे. त्यानंतर ३० जुलै रोजी सकाळी १० वाजता आढावा बैठक, ११.३० वाजता विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानंतर १२ वाजता पत्रकार परिषद ते घेणार आहे. या पत्रकार परिषदेनंतर १२.३० वाजता पोलीस मैदानावर मालेगाव येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर ते दुपारी ४ वाजता मनमाड येथे जाणार आहे. येथून ते येवलामार्गे वैजापूर येथे रवाना होणार आहे. या दोन दिवसाच्या तयारीसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून शिंदे गटाचे शक्तीप्रदर्शन सुध्दा या दौ-या निमित्त केले जाणार आहे.