औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. शिंदे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई होत आहे. राऊत यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांनी काहीही केलेले नाही. त्यामुळे कर नाही त्याला डर कशाला. ईडीला त्यांचे काम करु द्या. त्यांच्या कारवाईनंतर सगळं काही समोर येईलच. आपण एक लक्षात घेतले पाहिजे की, ईडी ही कायदेशीरदृष्ट्या कारवाई करते. यापूर्वीही अनेक जणांवर कारवाई झाली आहे. त्यातील काही जण न्यायालयातही गेले. पण, काय झाले, हे आपण सर्वांनी पाहिलेच आहे. त्यामुळे जे काही होते आहे ते होऊ द्या. त्याचे वेगळे अर्थ काढू नका, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
Chief Minister Eknath Shinde Reaction on Sanjay Raut Ed Raid