शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पुणे आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतले हे महत्त्वाचे निर्णय

by Gautam Sancheti
ऑगस्ट 2, 2022 | 5:40 pm
in राज्य
0
0x375

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे विभागातील जनहिताच्या विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जनतेच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून विकासकामे वेगाने पूर्ण करावी. विकासकामांसाठी प्रशासनाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, विविध विभागांचे राज्य आणि विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

श्री.शिंदे म्हणाले की, पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम त्वरित पूर्ण करावे. शासनाच्या मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. दरड प्रवण गावातील तात्पुरते स्थलांतर केलेल्या नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्यात याव्यात. प्राणहानी व घरांच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आवश्यक निधीची मागणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विभागातील पेरणी, पीक कर्जवाटप, बी-बियाणे आणि खतांची उपलब्धता याचाही आढावा घेतला. कृषि निविष्ठांची कमतरता भासू देऊ नये आणि निकृष्ठ बियाण्यांच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवावे. पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल याकडेही लक्ष द्यावे. पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वेळेवर मिळावा यासाठी विमा कंपन्यांना सूचना देण्यात याव्यात. पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा आणि विभाग स्तरावर बैठका घेण्यात याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

कोविड वर्धक मात्रेबाबत जनप्रबोधन करा
मुख्यमंत्र्यांनी विभागातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. कोविडची वर्धित मात्रा घेण्यासाठी नागरिकांच्या प्रबोधनावर भर द्यावा आणि व्यापक प्रमाणात सर्व माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात यावी. येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयात लसीकरण शिबिरांचे आयोजित करावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ दिवस लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. पावसाळ्यातील आजार, डेंग्यू, मंकीपॉक्स आदी आजाराबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश श्री.शिंदे यांनी दिले.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी योग्य नियोजन करा
बैठकीत विभागातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. पुणे रिंगरोडसाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामाला गती द्यावी. भूसंपादततील वादाचे मुद्दे लोकअदालतीच्या माध्यमातून सामोपचाराने सोडवावे. वाहतुकीचे नियोजन करताना रिंगरोडला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचा समावेश करावा. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. रस्त्यावरील खड्डे भरताना तात्पुरते काम न करता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. पुणे महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील एकात्मिक वाहतूक आराखड्याबाबत एकत्रित बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

केंद्र पुरस्कृत योजनांना गती द्या
प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करावे. राज्य आणि केंद्रशासनाच्या योजनांचा आढावा विभागीय आयुक्त स्तरावर घेण्यात यावा. राज्यातील विविध योजनांसाठी केंद्र सरकार निधी देण्यास तयार आहे. केंद्र सरकारकडे प्रलंबित बाबी मार्गी लागण्यासाठी राज्य शासन आवश्यक पाठपुरावा करेल. अशा विकास योजनांच्या कामाला गती देण्यात यावी.

धार्मिक स्थळांच्या ठिकाणी भाविकांना आवश्यक सुविधा द्या
मुख्यमंत्री शिंदे यांनी पर्यटन आणि धार्मिक स्थळ विकासकामांचा आढावा घेतला. पंढरपूरचा विशेष विकास आराखडा तयार करावा. रस्ते, पदपथ, स्वच्छतागृह, स्नानगृह अशा सर्व उत्तम सुविधांचा त्यात समावेश करण्यात यावा. भीमाशंकर येथील विकासकामे उत्तम दर्जाची करावीत. विभागातील सर्व धार्मिक स्थळाच्या ठिकाणी भाविकांना अडचण येणार नाही असेच विकासाचे नियोजन व्हावे. पुणे विभागातील सर्व तीर्थस्थळांच्या विकासाबाबत एकत्रित सादरीकरण करण्यात यावे.

सातारा जिल्ह्यातील कास पठार पर्यटन विकास, मेढा-केळघर येथील पुलाचे काम, प्रतापगड परिसर विकास, शिखर-शिंगणापूर विकास आदींबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. गणेशोत्सव उत्साहाने साजरा होईल यादृष्टीने प्रशासनाने गणेश मंडळांशी समन्वयाने नियोजन करावे. सण-उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखली जाईल आणि शांततेत सर्व उत्सव पार पडतील याविषयी दक्षता घ्यावी, अशाही सूना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.

‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम यशस्वी करा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम घराघरात पोहोचविण्यासाठी सर्व यंत्रणेचा सहभाग घ्यावा. स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेत ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम यशस्वी करावा. घरावर तिरंगा फडकविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
विभागीय आयुक्त श्री.राव यांनी बैठकीत पुणे विभागातील विविध विषयांबाबत सादरीकरण केले. विभागात ३१ जुलैपर्यंत सरासरीच्या ८१ टक्के पाऊस झाला आहे. विभागातील मोठ्या प्रकल्पात ७१ टक्के, मध्यम प्रकल्पात ६५ आणि लघू प्रकल्पात ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे. ४४ तालुक्यातील १५० महसूली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या ७ व्यक्तींच्या वारसांना २८ लाख रुपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे. २ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस माजी मंत्री तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, संग्राम थोपटे, महेश लांडगे, सुनिल कांबळे, अशोक पवार, चेतन तुपे, सुनील टिंगरे, भीमराव तापकीर, राहूल कुल, सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अंकुश शिंदे, विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागातील इतर अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.
प्रारंभी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे आगमन झाल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचे विभागीय आयुक्त राव यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रशासनाच्यावतीने स्वागत केले.

पोषकतत्वयुक्त आहार वाटपाचा शुभारंभ
पुणे जिल्हा परिषदेंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्यावतीने अंगणवाडी केंद्रातून पोषकतत्वयुक्त आहार अंतर्गत हॉर्लिक्स वाटपाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेने कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत हिंदुस्थान युनिलीव्हर सोबत सामंजस्य करार केला असून कंपनी वर्षभर मोफत हॉर्लिक्स पुरवणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात बालकांना हॉर्लिक्सचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील बालकांच्या आहारामध्ये आवश्यक त्या प्रमाणात सुक्ष्म पोषकतत्वे, जीवनसत्वे आदी पोषक तत्वांचा समावेश व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

कोरोनामुक्त गाव स्पर्धेतील यशस्वी गावांना पुरस्कार
राज्य शासनाने सुरू केलेल्या कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजनेंअंतर्गत माण, ता. मुळशी आणि सपकळवाडी, ता. इंदापूर या ग्रामपंचायतींनी कोविड व्यवस्थापनामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल या गावांना मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते कोरोना मुक्त गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोनामुक्तीसाठी कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष, कोरोना तपासणी, कोविड हेल्पलाईन पथक आदींच्या माध्यमातून या गावांनी उत्कृष्ट काम केले आहे.

वेटलिफ्टर हर्षदा गरुडचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
ग्रीस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या वडगाव मावळ येथील हर्षदा गरुडचा मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सत्कार केला आणि तिला पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. हर्षदाने जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टींग स्पर्धेतील ४५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले आहे. या स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्ण पदक मिळाले.

Chief Minister Eknath Shinde Pune Review Meeting

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; विल्होळीत १ लाख ४३ हजाराचा गुटखा जप्त

Next Post

आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत आणि पाकिस्तानचा सामना या दिवशी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Untitled 14
महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान टँकरने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी….कर्नाटकातील घटना

सप्टेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
Next Post
Asia Cup 2022 e1683624986348

आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत आणि पाकिस्तानचा सामना या दिवशी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011