मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या घरावर टाकलेला ईडीने छापा टाकला. त्यानंतर राऊत यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. आणि अखेर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. राऊत यांच्या घरुन ईडीने तब्बल ११ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. या नोटांवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे लिहिलेले आढळले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात आता शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच प्रतिक्रीया दिली आहे.
शिंदे यांची अयोध्येच्या राम मंदिराला देण्याची ही रक्कम राऊतांनी घरात का ठेवली? ती रक्कम अयोध्येला द्यायची होती की शिंदे यांना? असे तर्कवितर्क लढविले जात आहेत. औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या रकमेवर माझे नाव असेल तर ते राऊतांनाच विचारा असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात ईडी नावाचं वादळ घोंघावत असून त्या वादळाच्या केंद्रस्थानी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आहेत. एका चाळीच्या पुनर्विकासात आर्थिक अफरातफर झाल्याच्या आरोपांखाली काल त्यांची संपूर्ण दिवसभर चौकशी झाली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या झालेल्या या चौकशीनंतर राऊतांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं. तिथे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. यानंतर साडे बाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केल्याची घोषणा केली.
या सगळ्या घडामोडीत कालचा सामनाचा अग्रलेखातील भाष्य कारणीभूत ठरले अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. कारण कालच्या सामनाच्या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. “कोश्यारी भाजपसाठी मतपेढी तयार करताहेत”, असं सामनात म्हणण्यात आल आहे. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील काल संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाई संदर्भात प्रतिक्रिया देताना याचा उल्लेख केला होता.
दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापेमारी करून तब्बल 11 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यावर एकनाथ शिंदे अयोध्या असे लिहिले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांची अयोध्येच्या राम मंदिराला देण्याची ही रक्कम राऊतांनी घरात का ठेवली? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या रकमेवर माझे नाव असेल तर ते राऊतांनाच विचारा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात एकनाथ शिंदे यांची जाहीर सभाही पार पडली. यावेळी हजारो लोक उपस्थित होते.
यावेळी एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या रकमेवर माझे नाव होते याची माहिती मला नाही. त्याची माहिती संजय राऊतच देऊ शकतात. अशा फालतू गोष्टीला मी घाबरत नाही. कर नाही त्याला डर कशाला? असे संजय राऊत म्हणत होते. ते म्हणत होते की, माझी काही चूक नाही मी काहीच केले नाही. मग आता दूध का दूध पानी का पानी होईल. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे. ते आत गेलेत, पण ते चौकशीसाठी गेलेत. राऊत यांची चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल आणि यामधून सत्य बाहेर येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही अतिशय कमी वेळामध्ये शेतकऱ्यांसाठी, जनतेसाठी धडाडीचे निर्णय घेतले. भविष्यात देखील जनतेला जे हवे तेच आम्ही देऊ, असेही ते म्हणाले.
Shivsena Rebel Chief Minister Eknath Shinde on MP Sanjay Raut Home Currency Notes Name ED Action