मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुजा चव्हाण या युवतीच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप असलेले आमदार संजय राठोड यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रतिक्रीया दिली आहे. शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड हे मंत्री होते. त्यांच्यावर आरोप झाल्याने त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी केली. पोलिसांनी या चौकशीनंतर राठोड यांना क्लीन चीट दिली. त्यामुळेच त्यांना आता संधी देण्यात आली आहे. यानंतरही कुणाचे काही म्हणणे असेल, सूचना असतील तर त्यांनी त्या मांडाव्यात. त्याचा नक्कीच विचार केला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/MahaGovtMic/status/1556894140914597888?s=20&t=tgIiCYfkMoMD5IzpLi06Xg
Chief Minister Eknath Shinde on Sanjay Rathod
New Maharashtra Cabinet
Cabinet Expansion Controversy