मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मालेगाव दौऱ्यावर असून यानिमित्ताने मालेगावला जिल्हा निर्मितीचा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला. यासंदर्भात त्यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मालेगाव हा जिल्हा व्हावा ही मागणी बऱ्याच वर्षांपासून आहे. यासंदर्भात आमदार दादा भुसे, सुहास कांदे, मुफ्ती आदींनी मागणी केली आहे. त्यामुळे यासंदर्भातही आज चर्चा करण्यात आली. लोकांच्या सोयीसाठी जिल्हा होताना काही सूचना आल्या आहेत. याप्रश्नी येत्या काही दिवसात आम्ही मुंबईत लवकरच बैठक घेणार आहोत. त्यात सर्व संबंधितांना बोलविण्यात येईल. आणि मालेगाव जिल्हा निर्मिती बाबत अतिशय सकारात्मकरित्या चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, अशी ठोस ग्वाही, मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
Chief Minister Eknath Shinde on Malegaon New District Demand