मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. शिंदे हे आज मालेगाव दौऱ्यावर आहेत. आढावा बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शिंदे म्हणाले की, राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी मराठी माणसाचे योगदान अतिशय अूल्य आहे. १०६ हुतात्म्यांमुळेच मुंबई ही महाराष्ट्रात आहे. हे योगदान कुणीही नाकारु शकत नाही. हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठीच शिवसेनेची स्थापना केली. त्यामुळे शिवसेना म्हणून आम्ही राज्यपालांच्या मताशी सहमत नाही. मराठी माणसाबाबत राज्यपालांनी असे वक्तव्य करायला नको होते. राज्यपाल हे संविधानिक आणि मोठे पद आहे. त्यामुळे आपल्या वक्तव्याद्वारे कुणाचाही अपमान होणार नाही, याची राज्यपालपदी असलेल्या व्यक्तीने काळजी घ्यायला हवी. मराठी माणसाच्या जोरावरच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
Chief Minister Eknath Shinde on Governor Koshyari Controversial Statement