मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात नवे सरकार स्थापन झाले असले तरी जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर आता मुख्यमंत्री होण्याचा मान एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. शिंदे सरकार दोन दिवसात बहुमत सिद्ध करणार आहे. मात्र, शिंदे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी सूरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई असा प्रवास केला का, की करावा लागला. यासंदर्भात आता त्यांनीच मोठा खुलासा केला आहे.
शिंदे म्हणाले की, आम्हाला काही विनाकारण फिरायचे हौस नव्हती, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आमचे राजकारण सुरू होते, ही आमच्या अस्तित्वाची लढाई होती. राज्यातील विविध मतदार संघातील मतदारांनी लोकप्रतिनिधी तथा आमदारांवर जो विश्वास टाकला. त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्हालाही वेगळी भूमिका घ्यावी लागली. त्यामुळेच आम्ही प्रथम सुरत, नंतर गुवाहाटी आणि त्यानंतर गोवा येथे गेलो. असे स्पष्टीकरण राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार परत या, परत या असे आवाहन करूनही करूनही बंडखोर आमदार आले नाहीत. त्यानंतर दोन-तीन दिवसांपूर्वीच हे सर्व आमदार पुन्हा विमानाने गोव्यात दाखल झाले. त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाला. आता आपण नेमके राज्याबाहेर का इतके दिवस का फिरत होतो? हे शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.
खरे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाला, मात्र त्यावेळी त्यांना पाठिंबा देणारे सर्व बंडखोर आमदार गोव्यात होते. त्यांनी शपथविधी लाईव्ह पाहिला. पण हे सर्व आमदार मुंबईत कधी परतणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व आमदार आज शनिवार, दि.२ जुलै रोजी मुंबईत परतणार आहेत. शिंदे म्हणाले की, मी पुन्हा सांगतो, मुख्यमंत्रीपदासाठी हे सर्व आम्ही केलेले नाही. आमच्या अस्तित्वाची लढाई होती. मतदारसंघातील नागरिकांनी आमदारांवर विश्वास टाकला. त्या विश्वासाला पात्र ठरण्यात काही अडचणी किंवा असमर्थता येत असेल तर त्याचा विचार आम्ही प्रथम केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका आम्ही घेतली, महाविकास आघाडी सरकारमध्ये काही भूमिका शिवसेनेला घेता आली नव्हती. त्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली होती, त्यातून हे सगळे घडले आहे, असेही शिंदे म्हणाले आहेत. तसेच सर्व आमदार हे स्वेच्छेने माझ्यासोबत आले. त्यांना इतर आमदारांची भूमिका पटली. त्यामुळे ते सहभागी झाले आहेत.
इतक्या ५० आमदारांपैकी कोणीही जोर जबरदस्तीने आलेले नाही, सर्व आमदार स्व ईच्छेने आले, इतके जण जोर जबरदस्तीने येऊच शकत नाही. या 50 आमदारांमधूल काही जण परत यावे म्हणून खूप प्रयत्न झाले. कोर्टाचा बडगा दाखवला, निलंबनाची भीती दाखवली, आमदारकी जाईल असेही सांगितले. पण कुणीही परत गेलेले नाही. त्यांनी एकजूट कायम ठेवली. कारण, त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. त्यांच्या अस्तित्वाची लढाई ते लढत होते. त्यामुळे त्यांच्या पाठीशी मी खंबिरपणे उभा होतो, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले.
आता या ५० आमदारांना मागील अडीच वर्षात आलेला अनुभव आता येणार नाही. त्यांना त्यांच्या मतदारसंघात अपेक्षित असलेली कामे, जनतेला हवे असलेली कामे होतील, यासाठी विकासप्रकल्पात निधी कमी पडणार नाही, याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून मी घेतली आहे.
दरम्यान, या बंडखोर गटाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला आहे. तसेच विधानसभेत शिवसेना या नावानेच आपला गट तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिवसेना सावध झाली आहे. राज्यातील सत्ता हातातून गेली, आता पक्ष हातातून जाता कामा नये म्हणून शिवसेना कामाला लागली आहे.
Chief Minister Eknath Shinde on CM Post Rebel MLA