औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्लीवारी करणार आहेत. येथून तातडीने ते दिल्लीकडे रवाना होणार आहेत. भाजप पक्षश्रेष्ठींना बेटून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते अंतिम चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच १ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यापूर्वीही ज्येष्ठ विधीज्ञांशी ते चर्चा करणार आहेत. पदभार घेतल्यापासून मुख्यमंत्र्यांची ही पाचवी दिल्लीवारी असणार आहेत.
३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महिना झाला तरी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दोघांचेच मंत्रिमंडळ आहे. महिन्याभरात राज्यातील कारभार विस्कळीत झाल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उत्तर देता देता शिंदे आणि फडणवीस यांच्या तोंडाला जणू फेस येत आहे. त्यातच शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेमुळे भाजप श्रेष्ठींनी अत्यंत साद पवित्रा घेतला आहे. म्हणूनच मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दिला जात नसल्याचे सांगितले जात आहे. १ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यापार्श्वभूमीवर शिंदे हे दिल्लीवारी करणार आहेत. ही त्यांची पाचवी दिल्ली भेट असणार आहे.
Chief Minister Eknath Shinde Delhi Visit