मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज बहुमत चाचणीमध्ये यश मिळविले आहे. सरकारला १६४ आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. या विजयानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदानाच प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर अनेक नेत्यांनी भाषण केले. या सर्व भाषणांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी सर्व आमदार, समर्थक, नेते आणि विरोधी पक्षाचेही आभार मानले. तसेच, यावेळी त्यांनी सभागृहात ३ मोठ्या घोषणा केल्या.
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल या इंधनावरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली. तसेच, राज्यांनाही विनंती केली की त्यांनी हा कर कमी करावा. मात्र, महाविकास आघाडी सरकारने त्यास विरोध केला. आणि इंधनावरील कर कमी केले नाहीत. मात्र, पंतप्रधानांच्या आदेशाचा मान राखत राज्य सरकार लवकरच इंधनावरील कर कमी करेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत आणला जाईल. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला त्याचा लाभ मिळेल, असे शिंदे यांनी घोषित केले.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ३ मोठ्या घोषणा अशा
– रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा.
– राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
– शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा शिवसेना-भाजप युती सरकारचा निर्धार…
https://twitter.com/MahaDGIPR/status/1543839237585653760?s=20&t=eqBL45vWrZRMZ3_QYu2bJQ
Chief Minister Eknath Shinde big announcement in assembly