नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज ते दिल्ली भेटीवर आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून सायंकाळी त्यांचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले. यानंतर महाराष्ट्र सदनात त्यांचे आगमन झाले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांनी त्यांचे स्वागत केले.
शिंदे आणि फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यापूर्वी या तिघांच्या गुप्त बैठका होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकार स्थापनेनंतर अखेर या तिघांची सार्वजनिक पहिलीच भेट झाली. शिंदे आणि फडणवीस हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह अन्य भाजप वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. या भेटीत महाराष्टातील खातेवाटप आणि मंत्रिमंडळ स्थापनेबाबत चर्चा अंतिम होणार असल्याचे सांगितले जाते. या बैठकीत हे दोघे कुणाकुणाला भेटतात आणि काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/AmitShah/status/1545452552786829313?s=20&t=u9GS3yIn2i5W-hMdz9rmfA
Chief Minister Eknath Shinde and DYCM Devendra Fadanvis two day Delhi Tour