मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होतो की काय अशी शंका निर्माण करणारी मोठी घटना घडल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक तीन दिवसांच्या रजेवर गेल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सोशल मिडिया पोस्टद्वारे तसे नमूद केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आले आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सह्याद्री अतिथीगृहात विविध बैठका घेतल्या. सर्व जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्याशी त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर याच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ते ३ दिवसांच्या रजेवर जाणार आहेत. त्यानुसार २५ ते २७ एप्रिल दरम्यान, मुख्यमंत्री हे सातारा येथील त्यांच्या गावी गेल्याचे सांगितले जात आहे. आपल्या मूळ गावी ते पुजा आणि अन्य विधींसाठी जात असल्याचे बोलले जात आहे.
गेले की पाठवले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक रजेवर गेल्याने राज्यात चर्चांना उधाण आले आहे. शिंदे हे रजेवर का गेले, ते सुद्धा अचानक, ते स्वतः गेले की त्यांना पठविण्यात आले अशा विविध प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत. राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा पुन्हा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन दिवस रजेवर गेले आहेत..
आणि इकडे कोकणातील बारसु येथे रिफायनरी विरोधात आंदोलन पेटले आहे. पोलीस दडशाहीच्या मार्गाने आंदोलन चिरड्यासाठी घुसले आहेत.
महाराष्ट्रात मोगलाई सुरु असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बेपत्ता.हा काय प्रकार आहे?@Dev_Fadnavis pic.twitter.com/68frlLDnXU— Sanjay Raut (@rautsanjay61) April 25, 2023
अंधारे, राऊत यांचा गौप्यस्फोट
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि खासदार संजय राऊत यांनी यांनी गौप्यस्फोट केला होता. अंधारे म्हणाल्या होत्या की, गुजरातच्या वर्तमानपत्रात एक वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यात म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तर, राऊत म्हणाले होते की, शिंदे यांचे डेथवॉरंट निघाले आहे.
मुख्यमंत्री शिंदे गेले
३ दिवसांच्या तातडीच्या रजेवर…!— nikhil wagle (@waglenikhil) April 25, 2023
राजकीय हालचाली गतिमान
सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या अधिकारासंदर्भातील आणि राजकीय सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू आहे. युक्तीवाद संपला असून आता अंतिम निकाल कधीही लागणार आहे. न्यायालयाकडून १६ आमदार अपात्र ठरविले तर त्यात शिंदेही असणार आहेत. त्यामुळे शिंदे यांना राजीनामा द्यावा लागले. शिंदे यांनी राजीनामा देताच संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होईल आणि दुसरा व्यक्ती मुख्यमंत्री बनेल, अशी चर्चा सध्या रंगली आहे. त्यातच आता शिंदे अचानक रजेवर गेल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
आज सकाळपासून
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ट्विटरवर सक्रीय असतात. आज सकाळपासून त्यांनी दोन ट्वीट केले आहेत. त्यातील एक शंकराचार्यांना अभिवादन केले आहे. आज आद्यशंकराचार्यांची जयंती आहे. त्यानिमित्त अभिवादनाचे ट्वीट त्यांनी केले आहे. तर, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनीही शिंदे यांनी ट्वीटद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.@PratapSarnaik
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 25, 2023
Chief Minister Eknath Shidne 3 Days Leave Politics