भोपाळ – सरकारी कामकाजाच्या विविध तक्रारी कायम असतात. मात्र, जेव्हा मुख्यमंत्र्यांच्याच गावात तक्रार असते तेव्हा काय होते, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. दिवाळीच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे त्यांचे गाव जेत मध्ये गेले. तेथे त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी गकाही ग्रामस्थांनी तक्रार केली की नळांना पाणी येत नाही. याची तत्काळ दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. नळाला पाणी येत नाही हे पाहणे मुख्यमंत्र्याचे काम आहे का, असा सवाल अधिकाऱ्यांना विचारत त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. त्यामुळे अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले. याप्रसंगाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. बघा हा व्हिडिओ
और जब मुख्यमंत्री @ChouhanShivraj को ग़ुस्सा आया, अपने गाँव जेत में ही नलों में पानी नहीं आने की शिकायत मिली तो अफ़सरों पर जमकर गरजे शिवराज सिंह @ABPNews @awasthis @pankajjha_ @SanjayBragta @dharmendra135 #MadhayPradesh pic.twitter.com/icMwEr4ZV2
— Brajesh Rajput (@brajeshabpnews) November 6, 2021