इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अति महत्त्वाच्या व्यक्तींना (व्हीव्हीआयपी) विशेष सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते, त्यात राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांचा समावेश असतो. या सर्वांबरोबर सुरक्षेचा मोठा वाहन ताफा असतो. तसेच कोणत्याही मार्गावर जाताना त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत अडचणी निर्माण होऊ नये म्हणून काही काळ वाहतूक बंद करण्यात येते. परंतु त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. नागरिकांच्या अत्यावश्यक कामाचा खोळंबा होऊ शकतो. हे लक्षात घेऊन आसामच्या मुख्यमंत्र्यांनी खुद्द त्यांच्या दौऱ्यादरम्यान अशाप्रकारे वाहतूक रोखल्याने तीव्र नाराजी व्यक्त करीत खुद्द पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत फटकारले.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून नागाव जिल्हा आणि पोलिस प्रशासनाने नागाव कॉलेजजवळ वाहनांची रहदारी काही काळ थांबवली होती, त्यामुळे मुख्यमंत्री चांगलेच संतापले. या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आसामचे मुख्यमंत्री म्हणतात, “डीसी (जिल्हाधिकारी) साहेब हे काय नाटक आहे? गाड्या का थांबवल्या आहेत. कोणी राजा महाराज येत आहेत का? असे करू नका. लोकांना त्रास होत आहे. गाड्या जाऊ द्या.” तसेच वाहतूक बंद करण्याची बाब मुख्यमंत्र्यांना आवडली नसल्याने त्यांनी याप्रकरणी सर्वांसमोर नागाव जिल्हाधिकाऱ्यांना फटकारले. तसेच तातडीने वाहतूक सुरू करण्याचे आदेशही दिले.
https://twitter.com/ANI/status/1482353706008199169?s=20
आसामचे मुख्यमंत्री एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नागावमध्ये होते. जिथे त्यांनी नागाव कॉलेजला स्वायत विद्यापीठ म्हणून घोषित केले. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांची शहरात उपस्थिती असल्याने नागाव डीसींनी वाहतूक थांबवली होती. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणाले, “माझ्या प्रवासादरम्यान जनतेला त्रास देऊ नये, अशा स्पष्ट सूचना असूनही, माझ्यासाठी वाहतूक थांबवल्याबद्दल मी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले. कारण राष्ट्रीय महामार्गावर अॅम्ब्युलन्ससह अन्य वाहने १५ मिनिटांपेक्षा जास्त काळ रोखण्यात आली होती.