नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या लोकार्पणासाठी सरन्यायाधीश भूषण गवई आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचे आज नाशिक विश्रामगृह येथे आगमन होताच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे भेट देत स्वागत केले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मा. श्री. चंद्रशेखर यांचा देखील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे भेट देत स्वागत केले.
