इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १० जवान शहीद झाले आहेत. एका नागरिकाचाही यात मृत्यू झाला आहे. सर्व जवान हे जिल्हा राखीव दलाचे (डीआरजी) कर्मचारी आहेत. हे जवान आपल्या साथीदारांना घेण्यासाठी खासगी वाहनाने अरणपूरला जात होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात काही नक्षलवादीही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
या घटनेला दुजोरा देत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला. या प्रकाराची माहिती असून ते दुःखद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. हा लढा शेवटच्या टप्प्यात सुरू असून नक्षलवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद संपवू, असे बघेल म्हटले आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या घटनेबाबत ट्विट करत म्हटले आहे की, नक्षलविरोधी कारवाईसाठी आलेल्या डीआरजी फोर्सवर माओवाद्यांनी आयईडी स्फोट केला. त्यात १० डीआरजी जवान आणि १ ड्रायव्हर शहीद झाल्याची बातमी आहे. दंतेवाडा येथील अरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे घडले आहे. हे अतिशय दुःखद आहे. आम्ही सर्व राज्यातील जनता त्यांना विनम्र अभिवादन करतो. आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी फोनवर चर्चा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आहे. सरकारच्या २०२१ च्या आकडेवारीनुसार, छत्तीसगडमध्ये असे ८ भाग आहेत जी नक्षलग्रस्त आहेत. त्यात दंतेवाडा, बस्तर, सुकमा, विजापूर, कांकेर, नारायणपूर, राजनांदगाव आणि कोंडागाव यांचा समावेश आहे. एप्रिल २०२१ मध्ये गृह मंत्रालयाने लोकसभेत सांगितले की, २०११ ते २०२० या १० वर्षांत छत्तीसगडमध्ये ३ हजार ७२२ नक्षलवादी हल्ले झाले, ज्यामध्ये ४८९ जवान शहीद झाले.
दंतेवाड़ा के थाना अरनपुर क्षेत्र अंतर्गत माओवादी कैडर की उपस्थिति की सूचना पर नक्सल विरोधी अभियान के लिए पहुंचे डीआरजी बल पर आईईडी विस्फोट से हमारे 10 डीआरजी जवान एवं एक चालक के शहीद होने का समाचार बेहद दुखद है।
हम सब प्रदेशवासी उन्हें अपनी श्रद्धांजलि अर्पित करते हैं। उनके…
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) April 26, 2023
Chhattisgarh naxal attack 10 drg personnel martyred