पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी आतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांनी आमरण उपोषणही पुकारले. संपूर्ण राज्याचाही दौरा त्यांनी केला. मराठा आरक्षणाबाबत राज्य आणि केंद्र सरकारकडून फारशी आश्वासक पावले टाकली जात नसल्याबद्दल संभाजीराजे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
लवकरच होणारी राज्यसभेची निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढविणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली. तसेच, स्वराज्य ही संघटनाही स्थापन करीत असल्याचे त्यांनी आज घोषित केले. आता पुन्हा संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. जनतेला एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ही संघटना काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अन्याय होत असलेल्या ठिकाणी वाचा फोडण्याचे काम ही संघटना करेल, असेही त्यांनीस्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाजार यांच्या विचारधारेवर ही संघटना काम करेल आणि त्यांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी ही संघटना कार्यरत राहील असे ते म्हणाले स्थापन करणार आहे. या महिन्यातच मी राज्याचा दौरा सुरू करेन. सर्वप्रथम संघटन आणि त्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील. आगामी काळात स्वराज्य नावाचा पक्ष आकारालाही येऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बघा त्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/watch/?v=417647596488013