नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परशुराम संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे याने राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध म्हणून नाशिक शहरातील माळी समाजाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी यांना निवेदन दिले. यावेळी महात्मा फुले समाज विकास संस्था माळी समाजसेवा परिषद अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र माळी समाज महासंघ श्री संत सावता माळी मंडळ महात्मा फुले विचार मंच ,श्रीमान सत्यशोधक प्रतिष्ठान या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते
या निवेदनात म्हटले आहे की, मनुवादी विचारसरणीच्या विरोधात लढताना विचारांची लढाई ही विचारांनीच करायला हवी तसे न करता भावना भडकवणारी वक्तव्य करून समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या या वृत्तीचा निषेध करत विश्वजीत देशपांडेवर त्वरित गुन्हा नोंदवून अटक करावी. भुजबळ हे बहुजन समाजाचे आधारस्तंभ ,मार्गदर्शक आहे. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपलं आयुष्य खर्ची घालत ओबीसी समाजाला न्याय व हक्क देण्याचे काम भुजबळ साहेब यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. वेळप्रसंगी माळी समाजासह ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. समाज समाजात जाती-जातीत भांडण लावणाऱ्या या मनुवादी वृत्तीचा आम्ही निषेध करतो असेही म्हटले आहे.
यावेळी विजय राऊत, शंकर नाना मोकळ, संदीप जगताप, पप्पू शिंदे ,मोहन माळी ,श्रीराम मंडळ, गुलाब माळी, विलास वाघ ,विनोद डोके ,गणेश खोडे ,संतोष पुंड ,दिपक मंडलिक,नाना नाईकवाडे ,महेश ढोले, ज्ञानेश्वर सोमासे ,पोपटराव जेजुरकर मच्छिंद्र माळी, शिवा बागुल, दादाजी अहिरे ,सचिन जगताप ,यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Chhagan Bhujbal Statement Vishwajit Deshpande Arrest Demand