शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे हित आणि विकासासाठीच आम्ही युतीमध्ये…मंत्री छगन भुजबळ यांची पत्रकार परिषदेत माहिती

by India Darpan
नोव्हेंबर 8, 2024 | 1:40 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20241108 WA0179 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राचे हित आणि विकासासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार माझ्यासह एकत्र आले. सर्वांनी पक्षप्रमुख अजित पवार यांना पत्र दिले. त्यानंतर आम्ही महायुतीमध्ये सहभागी झालो. परिणामी, आज राज्यात कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. माझ्या एकट्या येवला मतदारसंघातच तब्बल दोन हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. जनता त्यावर बेहद्द खुश आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, दै. ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचे त्यांनी खंडन केले.

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, ‘दै. ‘लोकसत्ता’ला मी कुठलीही मुलाखत दिलेली नाही किंवा मी कुठलेही पुस्तक लिहिलेले नाही. तसेच ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झाल्याचा आरोप हा केवळ आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मला तुरुंगात जाण्याची कुठलीही भीती नाही. बातमीत जे काही प्रसिद्ध झाले तसे मी काहीही बोललेलो नाही. आम्ही विकासासाठीच सत्तेत सहभागी झालेलो आहोत. महाराष्ट्र सदन प्रकरणात न्यायालयाने मला क्लीन चीट दिलेली आहे. ते सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी मंत्रिमंडळात होतो. त्यावेळीच न्यायालयाचा निकाल आलेला आहे. त्यामुळे शंका घेण्याची किंवा संभ्रम होण्याची काहीही गरज नाही’, असे त्यांनी स्पष्टोक्ती भुजबळ यांनी दिली.

भुजबळ पुढे म्हणाले की, ‘पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे पुस्तक मी पाहिलेले किंवा वाचलेले नाही. तसेच, या पुस्तकात काय प्रसिद्ध झालेले आहे ते सुद्धा मी पाहिलेले नाही. मात्र, हे पुस्तक मी घेणार आहे. तसेच, माझ्या वकीलांनाही देणार आहे. त्यानंतर वकीलांशी चर्चा करुन मी पुढील योग्य ती कार्यवाही करणार आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर असे का छापले? त्यांचा उद्देश काय आहे?’ असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला.

ईडीच्या कारवाईबाबत बोलताना भुजबळ यांनी सांगितले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही ५४ आमदार आहोत. या सर्वांवरच ईडीने कारवाई केलेली नाही. त्यामुळे शंका निरर्थक ठरते. तसेच, ईडीची कारवाई ही काही विशिष्ट समाजाच्या नेत्यांवरच झाली असे म्हणणेही चुकीचे आहे. महायुती सरकारने अतिशय दमदार कामगिरी केली आहे. मतदारसंघांमध्ये कोट्यवधींची कामे होताना पाहून जनताही खुष आहे. जनतेला विकास हवा आहे. निवडणुकीत जनता महायुतीच्या बाजूने आहे’, असेही भुजबळ यांनी ठामपणे सांगितले.

सिंहस्थ कंभमेळ्याचे प्रस्ताव तातडीने मंजूर होतील
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये भव्य जाहीर सभा होत आहे. पंतप्रधानांकडून नाशिकच्या अपेक्षा नेहमीच पूर्ण होत असतात. कांद्याला सध्या साडेपाच हजारापेक्षा जास्त दर मिळतो आहे. त्यामुळे शेतकरी खुष आहेत. आगामी कुंभमेळा आणि विकासाबाबत आम्ही जे काही प्रस्ताव केंद्र सरकारला देणार आहोत ते तातडीने मंजूर होतील. कुठलीही अडचण येणार नाही. पंतप्रधानांचे ध्येय विकास हेच आहे आणि तेच घडते आहे’, असे भुजबळ यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आचारसंहिता भंगाच्या ३११२ तक्रारी निकाली; ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

Next Post

रिपब्लिकन’च्या या दोन पक्षांचा समीर भुजबळ यांना पाठिंबा…..

Next Post
IMG 20241108 WA0183 1

रिपब्लिकन’च्या या दोन पक्षांचा समीर भुजबळ यांना पाठिंबा…..

ताज्या बातम्या

rape

तरूणीवर बळजबरीने बलात्कार…नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 21, 2025
IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

जून 21, 2025
World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011