नाशिक – नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे. पालकमंत्री हे निधी लाटत असल्याचा आरोप कांदे यांनी केला. त्यानंतर याप्रकरणी कांदे हे थेट उच्च न्यायालयात गेले आहेत. अशातच आपल्याला भुजबळांच्या नावे थेट छोटा राजनच्या साथीदारांकडून धमकी आल्याची तक्रार कांदे यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी पोलिस आयुक्तांना दिले आहेत. या सर्व प्रकरणावर पालकमंत्री भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. बघा ते काय म्हणत आहेत