मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना आज सकाळी मुंबईच्या बॉम्बे हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना व्हायरल इन्फेक्शनमुळे त्रास झाला असून सायंकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.
छगन भुजबळ यांचा नुकताच ७७ वा वाढदिवसा झाला. त्यानंतर नाशिक येथेही त्यांनी विविध कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या शिबिरालाही ते उपस्थितीत होते. या सर्व कार्यक्रम दरम्यान त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व कार्यक्रम दरम्यान भेटण्यासाठी मोठी गर्दी होत होती. त्यात हे व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे बोलले जाते.