मंगळवार, डिसेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर फोन करून १ कोटीची खंडणी उकळण्याचा प्रयत्न….पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या

मे 17, 2025 | 3:02 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Screenshot 20250517 144809 WhatsApp

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मी इन्कम टॅक्स पथकातील अधिकारी असून फार्म हाऊसवर इन्कम टॅक्सची रेड पडणार आहे, मदत हवी असल्यास १ कोटी रुपये द्यावे लागतील असे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर फोन करून खंडणी उकळण्या चा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहे.

आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे सांगुन माजी मंत्री यांचे स्विय सहाय्यक यांना फोन करून १ कोटीची मागणी करणारा हा आरोपी जेरबंद झाला आहे.
२३ एप्रिल ते १६ मे २०२५ पावेतो आमदार छगन भुजबळयांचा मोबाईल हा त्यांचे स्वीय सहायक संतोष आबासाहेब गायकवाड हे वापरत असल्याने त्यांच्या मोबाईलवर अनोळखी इसम याने वेळोवेळी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करून “मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे. तुमचे साहेबांचे त्र्यंबकेश्वर नाशिक फार्म हाउसवर माल ठेवलेला आहे. तेथे आयकर विभागाची रेड पडणार आहे, त्या टीम मध्ये मी आहे. तुम्हाला मदत हवी असल्यास १ कोटी दयावे लागतील अशी खंडणीची मागणी केली होती. तसेच पैसे नाही दिले तर कार्यवाही करण्याची धमकी दिली होती. सदरचा मोबाईल क्रमांक त्यांचे स्वीय सहायक संतोष आबासाहेब गायकवाड यांच्या मोबाईलवर डायव्हर्ट असल्याने त्यांनी सदरची घटना ही पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याशी संपर्क करून त्यांना सांगितली.

त्यानंतर पोलीस आयुक्त., नाशिक शहर यांनी पोलीस उप-आयुक्त, गुन्हे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ चे वपोनि/मधुकर कड व पोउनि/चेतन श्रीवंत यांचे पथक तयार केले. त्यानंतर सदर अनोळखी आरोपीने वेळोवेळी फोन करून १ कोटी रूपयांची रोकड घेवून धरमपुर राज्य गुजरात येथे स्वीय सहायक संतोष आबासाहेब गायकवाड यांना बोलवले होते. त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट कमांक १ चे वपोनि/मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि/वेतन श्रीवंत, पोहवा / रमेश कोळी, प्रदीप म्हसदे, योगीराज गायकवाड, महेश साळूके, प्रशांत मरकड, विशाल काठे, देविदास ठाकरे, नाजीमखान पठाण, पोअं/आप्पा पानवळ, नितीन जगताप, राहुल पालखेडे अशा पथकाने स्वीय सहायक संतोष आबासाहेब गायकवाड यांनी मागणी केल्याप्रमाणे काही डमी व काही खरे पैसे हे साक्षीदार नरेंद्र पुंडलिक सोनवणे यांच्याकडे दिले होते.

त्या अनुषंगाने सदरचे पथक हे आरोपीताचा शोध घेणे करीता नाशिक येथुन धरमपुर गुजरात येथे सदरचे पथक पोहचले असता साक्षीदार नरेंद्र पुंडलिक सोनवणे यांच्या मोबाईलवर अनोळखी आरोपीने वेळोवेळी वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून वेगवेगळया ठिकाणी बोलाविले. परंतू सदर ठिकाणी आरोपी न आल्याने गुन्हे शाखा युनिट क. १ कडील पथक हे पुन्हा नाशिककडे परतीच्या मार्गाला असतांना आरोपीने पुन्हा साक्षिदार नरेंद्र सोनवणे यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून सांगितले की, मी करंजाळी येथील हॉटेल टितम व्हॅली येथे आहे. तुम्ही तेथे या असे सांगितले. त्यानुसार वरील पथक करंजाळी येथील हॉटेल रितम व्हॅली येथे वेशांतर करून सापळा लावुन थांबलेले असतांना थोड्यावेळाने एक इसम हा मोटार सायकलवर येवून नरेंद्र सोनवणे यांचे जवळ येवून थांबला व त्याने तुम्ही सोनवणे आहात काय बाबत विचारणा करून त्यांच्या कडे पैशाची मागणी केली.

त्यानंतर नरेद्र सोनवणे यांनी त्यांच्या ताब्यातील पैशावे बंडलाची बॅग ही सदर आरोपीताच्या ताब्यात दिली. त्यानंतर आरोपी हा मोटार सायकलवर बॅग घेवून पळून जात असतांना पोलीस पथकाने त्यास शिताफिने पकडून ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव राहूल दिलीप भुसारे, वय-२७वर्षे, रा. करंजाळी हनुमान मंदीर शेजारी, शंभू किशोर गवळीच्या शेजारी ता. पेठ जि. नाशिक असे सांगितले. त्याचेकडे गुन्हयाबाबत अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे तुमचे साहेबांचे अंबकेश्वर नाशिक फार्म हाउसवर आयकर विभागाची रेड पडणार आहे. त्या टिम मध्ये मी आहे. तुम्हाला मदत करायची आहे असे सांगून १ कोटी रूपयाची खंडणीची मागणी व ती स्वीकारली बाबत त्याने कबुली दिली. त्यानंतर त्याच्या ताब्यातुन गुन्हा करतेवेळी वापरलेली काळया रंगाचे होंडा कंपनीची शाइन मोटार सायकल मोबाईल फोन, एक काळया रंगाच्या बॅगमध्ये ५०० रूपये दराच्या ६० भारतीय चालनी नोटा, व ५००/-रू दराच्या भारतीय बच्चो का बैंक असे नाव असलेल्या खेळण्यातील नोटांचे एकूण १५ बंडल व रद्दी पेपर असा ८५,५००/-रूपये एकूण किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत फिर्यादी संतोष आबासाहेब गायकवाड यांनी दिलेल्य फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाणे येथे ३२५/२०२५ भा.न्या.सं. कलम २०४, ३०८ (२), ३०८ (५), ३५१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपीताची वैदयकीय तपासणी करून त्यास जप्त मुद्देमालासह अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास अंबड पोलीस ठाणे करीत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

Next Post

नाशिक शहरात रविवारी या भागातील टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा राहणार बंद…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
mahavitarn

नाशिक शहरात रविवारी या भागातील टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा राहणार बंद…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011