बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या खोऱ्यातील उपलब्ध होणारे ९.७६ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार…भुजबळांच्या तारांकित प्रश्नांवर जलसंपदा मंत्रीनी दिली सभागृहात माहिती

by India Darpan
मार्च 7, 2025 | 1:32 pm
in स्थानिक बातम्या
0
bhujbal 11

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पार तापी नर्मदा हा आंतरराज्यीय प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नार पार औरंगा अंबिका खोऱ्यात ९.७६ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून हे सर्व पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावरील उत्तरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली आहे.

पार गोदावरी एकात्मिक नदी जोड योजना राबविण्याबाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, पार तापी नर्मदा हा आंतरराज्य प्रकल्प रद्द करून घेतल्यामुळे नार पार खोऱ्यातील शिल्लक ४.६७ टीएमसी,आणि उपसा सिंचन योजना क्रमांक ३ आणि ४ चे जे काही ३ टीएमसी आणि नार गिरणा नदी जोड प्रकल्पाला जाणार नाही असे उरलेले सर्व पाणी एकत्रीत करून पार- गोदावरी हा राज्यांतर्गत एकात्मिक नदी जोड प्रकल्प राबविला जाणार आहे का ? या प्रकल्पासाठी ज्या काही पायाभुत सुविधा लागणार आहे.त्या आपण मांजरपाडा योजनेच्या माध्यमातून आधीच करून ठेवल्या आहे. डोंगराला ९.५० किमी बोगदा तयार आहे.याच बोगद्याद्वारे पार गोदावरीचे पाणी पुणेगाव धरणातून पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याद्वारे आपण दिंडोरी-चांदवड-येवला आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर-गंगापूर या दुष्काळी भागात नेणार आहोत.जवळजवळ २५२ कोटी निधीमधून या कालव्याच्या लाइनिगंचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. म्हणजेच पाणी वळविण्यासाठी आणि वाहून नेण्यासाठी सर्व सुविधा तयार आहे.
या पार- गोदावरी राज्यांतर्गत एकात्मिक नदी जोड प्रकल्प योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी कोणावर सोपवली आहे ? हा DPR (सविस्तर प्रकल्प अहवाल) कधीपर्यंत SLTAC (राज्य तांत्रिक सल्लागार समिती)ला सादर होईल ? त्याचप्रमाणे पायरपाडा आणि गुगुळ या प्रवाही वळण योजनांचे पाणी पुणेगाव धरणात आणले जाणार आहे काय ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या प्रश्नाच्या उत्तरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,पार तापी नर्मदा गोदावरी प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नार पार औरंगा अंबिका खोऱ्यात ९.७६ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून हे सर्व पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. सदर प्रकल्प राबविण्यासाठी हायड्रोलॉजी विभागाला यासंदर्भातील सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तीन महिन्यांत हे सर्वेक्षण करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी ड्रोनचा वापर करून जलद गतीने हे काम मार्गी लावण्यात येईल.एकूण ३० वळण योजना प्रस्तावित असून १४ योजनांची कामे पूर्ण केली असून ८ वळण योजनांची कामे सुरु आहे. या सर्व योजनांचा एकत्रित विचार करून विकास करण्यात येत असून दिंडोरी तालुक्यासाठी पायरपाडा व गुगळ योजना राबविण्यात येत असून छगन भुजबळ यांच्या मागणी प्रमाणे हे पाणी पुणेगांव धरणात वळविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उष्माघात जीवघेणा ठरु नये यासाठी, अशी घ्या काळजी…

Next Post

अंगावर दुचाकी घालत भररस्त्यात तरूणीचा विनयभंग…वडाळानाका भागातील घटना

Next Post
rape

अंगावर दुचाकी घालत भररस्त्यात तरूणीचा विनयभंग…वडाळानाका भागातील घटना

ताज्या बातम्या

Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025

स्वस्त धान्य दुकानदाराचा रेशनवर डल्ला…८४ क्विंटल धान्य केले परस्पर हडप

जून 18, 2025
Nitin Gadkari e1708960950705

टोलची झंझट समाप्त….आता तीन हजार रुपयात मिळणार वर्षभराचा पास

जून 18, 2025
Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011