नवी दिल्ली – सध्या जगभरातील अनेक देशात झपाट्याने वाढत असलेला कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणू प्रकारामुळे आरोग्य तज्ज्ञांसाठी योग्य उपाययोजना हा गंभीर व चिंतेचा विषय आहे. कारण ओमिक्रॉनच्या संसर्गाची गती खूप वेगवान असल्याचे म्हटले जाते, तसेच यावरून लक्षात येते की, अनेक देशांमध्ये त्याचे संक्रमण काही दिवसात समुदायात पसरले आहे.
ओमिक्रॉनच्या प्रकारामुळे इंग्लड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये कहर होत आहे. भारतामध्ये तर, संसर्गाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जगभरातील सर्व शास्त्रज्ञ कोरोनाच्या या अत्यंत संसर्गजन्य प्रकाराबद्दल जाणून घेण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत आणि ते रोखण्याचे मार्ग शोधत आहेत. त्यातच आता नव्या प्रकारचे च्युइंगम खाल्ल्याने असे म्हटले जाते.
च्युइंगम इफेक्ट
कोरोनापासून बचाव करण्याच्या पद्धतींचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या टीमने वनस्पती-आधारित प्रथिने वापरून नवे च्युइंगम विकसित केला आहे. त्यांचा असा दावा आहे की, च्युइंगम सार्स-कोव्ह -2 विषाणूविरूद्ध सापळा म्हणून काम करू शकते. हे च्युइंगम चघळल्याने कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो.
नव्या अवतारांचे काय?
‘जर्नल ऑफ मॉलिक्युलर थेरपी’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात शास्त्रज्ञांनी या च्युइंगमबद्दल सांगितले आहे. पेन स्कूल ऑफ डेंटल मेडिसिनचे प्रोफेसर हेन्री डॅनियल्स आणि यूएसए शास्त्रज्ञांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या नव्या च्युइंगमकडे कोविड-19 महामारीविरुद्ध प्रभावी शस्त्र म्हणून पाहिले जात आहे. या च्युइंगमचा वापर कोरोना विषाणूचा प्रसार कमी करण्यात विशेष मदत करू शकतो, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
लाळेमध्येच विषाणू निष्प्रभ
प्रोफेसर हेन्री डॅनियल म्हणतात, सार्स-कोव्ह -2 विषाणूवर दीड वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की हा विषाणू लाळ ग्रंथींमध्ये प्रतिरूपित होतो. जेव्हा एखादी संक्रमित व्यक्ती शिंकते, खोकते किंवा बोलते तेव्हा त्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे ते इतरांकडे जाऊ शकते. या च्युइंगममध्ये लाळेत विषाणू निष्प्रभ करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे रोगाचा प्रसार होण्याचा धोका कमी होण्यास मदत होईल.
कोरोनाचा प्रसार कमी
ACE2 श्वसन यंत्र वापरून विकसित केले. तोंडातील कोरोना विषाणू निष्फळ करण्यासाठी वैज्ञानिकांनी वनस्पतींपासून उगवलेल्या प्रथिनांपासून च्युइंगम विकसित करण्यास सुरुवात केली. यासाठी टीमने वनस्पतींमध्ये ACE2 रेस्पिरेटर विकसित केले. त्यात संयुगे देखील आहेत ज्यामुळे प्रथिने श्लेष्मल अडथळे पार करण्यास सक्षम होते. कोविड रूग्णांच्या स्वॅबवर च्युइंग गमच्या चाचणीवरून असे दिसून आले आहे की त्यात असलेले ACE2 सार्स-कोव्ह -2 – विषाणूला निष्प्रभ करू शकते.
बचाव करण्याचे उपाय
प्रोफेसर डॅनियल म्हणतात की, कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी करण्यासाठी आम्ही आधीच मास्क आणि इतर उपाय वापरत आहोत. हे च्युइंगम त्या लढ्यात अतिरिक्त साधन म्हणून वापरले जाऊ शकते. हे संशोधन अद्याप प्राथमिक अवस्थेत असले तरी, क्लिनिकल चाचण्या हे सिद्ध करतात की, च्युइंगम हिरड्यांसाठी सुरक्षित आहे.