नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील व्यावसायिकाला दिलेला धनादेश न वटल्या प्रकरणी नाशिक येथील एकास सहा महिन्याची सजा ठोठावण्याचा आणि तक्रारदाराला साडेचार लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश नागपूरचे मुख्य दंडाधिकारी यांनी दिला आहे.
यासंदर्भातील प्राप्त माहितीनुसार, बद्रीविलास ऊर्फ लाला चतुर्भुज केला (रा. नाशिक) यांनी नागपूरस्थित व्यावसायिक अनिल गांधी यांना विशिष्ट कामाच्या मोबदल्यात एक धनादेश दिला होता. तथापि धनादेश न वटल्याने तक्रारदार अनिल गांधी यांनी केला यांच्या विरोधात कलम १३८ अन्वये न्यायालयाकडे दाद मागितली. संबंधित तक्रार ग्राह्य धरत नागपूरचे दंडाधिकारी यांनी बद्रीविलास केला यांना सहा महिन्याची साध्या प्रकारची सजा ठोठावण्याचा तसेच कलम ३५७ (३) अंतर्गत तक्रारदाराला शिक्षा जाहीर झाल्या दिवसापासून दोन महिन्यांच्या आत साडेचार लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला. तक्रारदारास जाहीर भरपाई वेळेत न दिल्यास संबंधितास एक महिन्याची अतिरिक्त सजा देण्याची तरतूद न्यायाधीशांनी निकालपत्रात केली आहे.
Cheque Bounce Nashik Trader Court Sentence Legal