शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

खबरदार! कोरोनाच्या धोरणावर टीका कराल तर…; चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा देशवासियांना सज्जड दम

by India Darpan
मे 14, 2022 | 11:31 am
in संमिश्र वार्ता
0
china 1

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना चीनमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढत आहे. कोविड-19 ची वाढती प्रकरणे आणि कडक लॉकडाऊन दरम्यान देशाच्या शून्य-कोविड धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी इशारा दिला आहे. जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. यामध्ये, सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च पॉलिटब्युरो स्थायी समितीने ‘डायनॅमिक झिरो-कोविड’ या सामान्य धोरणाचे ठामपणे पालन करण्याचा आणि देशाच्या साथीच्या प्रतिबंधक धोरणांना नकार देणाऱ्या कोणत्याही शब्द आणि कृतींविरुद्ध दृढनिश्चयाने लढण्याचा निर्धार केला.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कोविडविरुद्धच्या चीनच्या लढाईवर जिनपिंग यांनी अशी सार्वजनिक टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आमची प्रतिबंध आणि नियंत्रणाची रणनीती पक्षाचे स्वरूप आणि ध्येयानुसार ठरवली जाते. आमची धोरणे इतिहासाच्या कसोटीवर टिकू शकतात, आमचे उपाय वैज्ञानिक आणि प्रभावी आहेत, असे स्थानिक माध्यमांनी सात सदस्यीय समितीच्या हवाल्याने म्हटले आहे.

वुहानच्या रक्षणाची लढाई आम्ही जिंकली असून शांघायच्या रक्षणाची लढाई आम्ही नक्कीच जिंकू शकू, असे समितीने म्हटले आहे. स्थायी समितीने कार्यकर्त्यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आखून दिलेल्या धोरणांची सखोल, संपूर्ण आणि सर्वसमावेशक माहिती घेण्यास सांगितले. गेल्या अनेक आठवड्यांत, शांघायमधील रहिवाशांनी अन्नाची तीव्र टंचाई आणि वैद्यकीय सेवेचा अभाव असताना मदतीसाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

चीनमध्ये कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे या वर्षी 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान होणार्‍या हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धा शुक्रवारी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नजीकच्या भविष्यात नवीन तारखा जाहीर केल्या जातील. यावर भारतीय खेळाडूंनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. शांघायमध्ये कोविड-19 च्या सतत वाढत असलेल्या प्रकरणांमुळे या खेळांच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. तसेच सध्या शांघायमध्ये लॉकडाऊन आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक-पुणे महामार्गावर बर्निंग बसचा थरार; प्रवाशांच्या सामानासह बस जळून खाक

Next Post

दिल्लीत भीषण अग्नितांडवः ३० मृतदेह ताब्यात, इमारतीच्या मालकांना अटक, अजूनही मदतकार्य सुरूच

Next Post
FSpwvq2VEAEwXcy

दिल्लीत भीषण अग्नितांडवः ३० मृतदेह ताब्यात, इमारतीच्या मालकांना अटक, अजूनही मदतकार्य सुरूच

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011