विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतीय वंशाच्या व्यक्तींनी विदेशात आपल्या कामगिरीची छाप पाडून भारताची मान कायमच उंचावली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची ही कामगिरी आपण बघतो आहे. आता सुमित्रा मित्रा यांच्या निमित्ताने आणखी एक भर पडली आहे. त्यांना यंदाचा प्रतिष्ठित असा युरोपियन इन्व्हेंटर अवॉर्ड बहाल करण्यात आला आहे.
सुमित्रा मित्रा यांच्या कंपनीने नॉन युरोपियन पेटंट आफिस कंट्रीज कॅटेगरीमध्ये नॅनोटेक्नॉलॉजीसाठी पटकावला आहे. सुमित्रा यांनी नॅनो पार्टिकल्सच्या माध्यमातून दातांना अधिक मजबूत करणारे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. जगातील हा पहिलाच प्रयोग आहे. त्यांच्या या तंत्रज्ञानाचा वापर संपूर्ण जगातील 1 अरब लोकांवर यशस्वीरित्या करण्यात आला आहे. युरोपियन पेटंट आफिसचे अध्यक्ष एंटोनियो केंपिनोज यांनी सांगितले की सुमित्रा यांनी या क्षेत्राला नवा आयाम देण्याचे काम केले आहे. दातांना पूर्ववत करण्याच्या क्षेत्रात त्यांचे हे तंत्र एक क्रांतीकारी पाऊल ठरले आहे. या तंत्रामुळे इतका व्यापक परिणाम झाला आहे की आज कोट्यवधी लोक त्याचा फायदा घेत आहेत. सुमित्रा यांनी आपल्या या संशोधनाचे पेटंटही करून घेतले आहे.
एंटोनियो यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सुमित्रा यांच्या या तंत्राचा वापर करून आता 20 वर्षे होऊन गेले आहेत. त्यांचा हा नवा शोध आणि तंत्रज्ञान बघून नवी पिढी विशेषत्वाने आकर्षित झाली आहे. भावी डॉक्टरांसाठी हा एक प्रेरणास्रोत ठरणार आहे.’ यंदा हा पुरस्कार सोहळा डिजीटल माध्यमातून होणार असल्याने जगभरातील लोकांशी जुळण्याची संधी त्यानिमित्ताने मिळणार आहे.
सुमित्रा मित्रा कोण आहेत?
केमिकलल कन्सल्टिंग एलएलसी या कंपनीत सुमित्रा मित्रा भागिदार आहेत. विविध कंपन्यांना नवे तंत्रज्ञान आणि त्यांच्यातील डेव्हलपमेंट, उत्पादन, डिझाईन, व्यवसायिक दृष्टीकोन, मर्जर आदींशी संबंधित माहिती देण्याचे काम त्या करतात. 2009 मध्ये त्यांना अमेरिकन केमिकल सोसायटीच्या वतीन ‘हिरो आफ केमिकल’ हा पुरस्कार देण्यात आला होता. तर 2018 मध्ये ‘यूएस नॅशनल इन्व्हेंटर्स हॉल आफ फेम’ हा सन्मान बहाल करण्यात आला होता.