नवी दिल्ली – भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुशील चंद्रा यांची, देशाचे २४वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केली. चंद्रा यांनी पदभार स्विकारला आहे. त्यांचा कार्यकाळ १४ मे २०२२ पर्यंत असणार आहे. याच काळात देशातील पाच राज्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यात गोवा, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
https://twitter.com/SpokespersonECI/status/1381617666167726081