मुंबई – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ होत असल्याने ग्राहक इतर पर्यायांच्या शोधात आहेत. पेट्रोल किंवा डिझेलवर सारखे इंधन येत्या काही वर्षात संपण्याची शक्यता असल्याने आगामी काळात अन्य पर्याय मोठ्या प्रमाणावर पुढे येणार आहेत. सध्या तरी इलेक्ट्रिक वाहने आणि सीएनजी सारखा पर्याय वाहन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करीत आहे काही नागरिक इलेक्ट्रिक वाहने घेत आहेत, तर काही सीएनजीची निवड करत आहेत. मारुती सुझुकीपासून ह्युंदाईपर्यंत, आघाडीच्या कार निर्माते त्यांच्या वाहनांमध्ये फॅक्टरी-फिटेड सीएनजीचा पर्याय देतात. देशातील 5 सर्वात स्वस्त सीएनजी कारबद्दल जाणून घेऊ या…
मारुती अल्टो 800
मारुती सुझुकी दोन CNG प्रकारांमध्ये येते, त्याच्या किंमती 4.76 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होतात. सदर कारचे इंजिन 41PS ची कमाल पॉवर आणि 60Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच CNG सह, ही कार 31.59km मायलेज देते.
मारुती एस-प्रेसो
मारुती एस-प्रेसो ही तीन सीएनजी प्रकारांमध्ये येते. त्यांची किंमत 5.11 लाख रुपये ते 5.37 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही कार इंजिनद्वारे 1.0-लिटर CNG सह 59PS ची कमाल पॉवर आणि 78Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच CNG सह, ही कार 31.2km मायलेज देते.
मारुती सुझुकी वॅगनॉर
CNG किटसह मारुती सुझुकी वॅगनॉरची किंमत 5.83 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार 1.0-लिटर इंजिनद्वारे समर्थित आहे जे CNG सह 59PS ची कमाल पॉवर आणि 78Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच CNG सह, ही कार 32.52km/kg मायलेज देते.
होंडाई सॅन्ट्रो
होंडाई सॅन्ट्रोच्या CNG व्हेरियंटची किंमत 5.99 लाख रुपये आहे. याला 1.1 लीटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते, जे 59PS ची कमाल पॉवर आणि 78Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. CNG सह, होंडाई सॅन्ट्रोमध्ये 30.48 km/kg पर्यंत मायलेज मिळते.
होंडाई ग्रॅंड i10 Nios
होंडाई ग्रॅंड i10 Nios च्या CNG व्हेरिएंटची किंमत 6.99 लाख रुपये आहे. या कारला 1.2-लीटर पेट्रोल इंजिन मिळते, ती 69PS ची कमाल पॉवर आणि 95Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. CNG सह, Hyundai Santro मध्ये 28.5km/kg पर्यंत मायलेज मिळते.