पुणे – भारतातील स्वस्त, उच्च दर्जाची फायबर ब्रॉडबँड सेवा मिळवण्याबद्दल ग्राहकांमध्ये नेहमी चर्चा सुरू असते तसेच अशी सेवा सुविधा मिळावी म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. कंपन्यांमध्ये देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी याबाबत स्पर्धा सुरू असते. एक्झिटेल ही देशातील अनेक ब्रॉडबँड सेवा देणारी कंपनी यात दिसून येत आहे. भारतातील स्वस्त, उच्च दर्जाची फायबर ब्रॉडबँड सेवा देण्यात जिओ फायबर ब्रॉडबँड ही कंपनी नेहमी वरच्यास्थानी आहे. परंतु आता एक्झिटेल कंपनी त्याच संदर्भात जिओ फायबरचा एक मोठा प्रतिस्पर्धी आहे. कारण एक्झिटेलचे ब्रॉडबँड प्लान हे ग्राहकांना जिओ फायबर प्लॅनपेक्षा अधिक परवडणारे आहेत. कारण 100 एमबीपीएस स्पीड ग्राहकांना फक्त 399 मध्ये उपलब्ध होईल.
एक्झिटेल ही प्लॅन वापरकर्त्यांना फक्त तीन ब्रॉडबँड योजना देते. या योजना 100 एमबीपीएस, 200 एमबीपीएस आणि 300 एमबीपीएस डाउनलोड किंवा अपलोड गतीसह देण्यात येतात. योग्य वापर-धोरण (FUP) मर्यादांवर कोणत्याही निर्बंधांशिवाय वापरकर्त्यांना अमर्यादित डेटा प्रदान करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.
एक्झिटेल योजना खूप स्वस्त आहेत, कारण 100 एमबीपीएस स्पीड असलेला बेस प्लॅन 699 रुपये दरमहा देण्यात येतो. तर 200 एमबीपीएस आणि 300 एमबीपीएस प्लान अनुक्रमे 799 आणि 899 रुपये दरमहा देण्यात येतात. एक्झिटेल सर्वात परवडणारे 200 Mbps आणि 300 Mbps ब्रॉडबँड प्लॅन देते. पण प्रकरण तिथेच संपत नाही. जितक्या जास्त काळ वैधतेची निवड कराल तितकी योजना स्वस्त होईल.
आपण म्हणजे ग्राहकाने 12 महिन्यांसाठी 100 एमबीपीएस स्पीड असलेल्या योजनेसाठी गेलात, तर दरमहा 699 रुपये देण्याऐवजी तुम्हाला दरमहा 399 रुपये (12 महिने x 399 रुपये) द्यावे लागतील. 200 एमबीपीएस आणि 300 एमबीपीएस योजनांवरही हेच लागू होते. एक्झिटेल त्याच्या 300 एमबीपीएस ब्रॉडबँड योजनेसह ओव्हर-द-टॉप (ओटीटी) लाभ देखील देते.