पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे अलीकडच्या काही महिन्यांत सीएनजी कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची क्रेझ वाढली आहे. अनेक मॉडेल्सवर 6 महिन्यांपर्यंतची प्रतीक्षा सुरू आहे. मारुती सुझुकी आणि ह्युंदाई आधीच त्यांचे सीएनजी मॉडेल विकत आहेत, आता टाटा मोटर्सने देखील या विभागात प्रवेश केला आहे. देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या सीएनजी वाहनांबद्दल जाणून घेणार आहोत.
मारुती डिझायर सीएनजी:
मारुती डिझायर व्हीएक्सआय सीएनजीची किंमत 8.14 लाख रुपये ते 8.82 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. सदर वाहन हे 1.2-लिटर K-Series Dualjet इंजिनद्वारे समर्थित आहे, ते 71bhp पर्यंत पॉवर आणि 98.5Nm टॉर्क जनरेट करते. मारुती डिझायर CNG मायलेज 31.12km/kg पर्यंत आहे आणि सेडान विभागात सर्वोत्तम मायलेज देणारी CNG कार आहे.
मारुती सुझुकी S-Presso CNG
Maruti S-Presso CNG ची CNG किंमत रु. 5.24 लाख रुपयांपासून सुरू होते आणि रु. 5.56 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. मारुती सुझुकी एस-प्रेसोमध्ये 1.0-लिटर इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन CNG मोडवर 58hp पॉवर आणि 78Nm टॉर्क जनरेट करते. हे CNG वाहन 31km/kg पर्यंत मायलेज देते.
मारुती सुझुकी अल्टो 800 CNG
सीएनजीवरील मायलेजच्या बाबतीत मारुती सुझुकी अल्टोचे नाव सर्वात किफायतशीर कारमध्ये समाविष्ट आहे. सीएनजी व्हेरिएंट अल्टो कार 31.59 किमी/किलोपर्यंत मायलेज देते. मारुती सुझुकी अल्टो 796 cc, 3 सिलिंडर F8D इंजिनद्वारे समर्थित आहे. CNG प्रकाराची सुरुवातीची किंमत 4,76,500 रुपये (दिल्ली एक्स-शोरूम) आहे.
मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी
मारुती सेलेरियो सीएनजी 1 किलो गॅसमध्ये 35.60 किमी मायलेज देते. सदर वाहन हे 1.0-लिटर K10C DualJet इंजिनद्वारे समर्थित आहे जे CNG सह 57hp कमाल पॉवर आणि 82.1Nm पीक टॉर्क निर्माण करते. कंपनीने हे फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह लॉन्च केले आहे. Celerio VXi CNG ची एक्स-शोरूम किंमत 6,58,000 रुपयांपर्यंत आहे.