नाशिक – धर्मादाय सह आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा उद्या १५ एप्रिल पासून नाशिक येथे होत आहे. राज्य स्तरावर होणाऱ्या या स्पर्धांचे आयोजन नाशिक विभागीय कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आले आहे. धर्मादाय सह आयुक्तालय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धांसाठी राज्यभरातील संघ नाशिक मध्ये दाखल झाले आहे. एकूण १६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून बक्षीस वितरण १६ एप्रिल रोजी सायंकाळी होणार आहे. गोल्फ क्लब मैदानावर दोन दिवस होणाऱ्या या स्पर्धांसाठी राज्यभरातून कर्मचारी उपस्थित राहणार आहे. धर्मदाय सह आयुक्त जयसिंग झपाटे सहाय्यक धर्मदाय आयुक्त राम लिप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.