रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धर्मदाय रुग्णालयांच्या मनमानीला चाप… राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय…

by India Darpan
ऑगस्ट 24, 2023 | 5:21 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
x570

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात सवलतीच्या दराने वैद्यकीय सेवा दिल्या जातात. या रुग्णालयांची अद्ययावत माहिती रुग्णांना ‘आरोग्य आधार’ या ॲपद्वारे तत्काळ मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

धर्मादाय रुग्णालयांतर्गत सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचविणे, हॉस्प‍िटल रजिस्ट्रेशन पोर्टलचे सादरीकरण, एनएचएम पीआयपी २०२३-२४ सद्यस्थितीतील प्रगतीचा आढावा, आरोग्य संस्थांच्या बृहत आराखड्याचे सादरीकरण संदर्भात बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते, यावेळी मंत्री डॉ. सावंत बोलत होते.

मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, धर्मादाय रुग्णालयाच्या कार्याबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करताना पारदर्शी काम व्हावे, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. धर्मादाय रुग्णालयाची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी, ‘आरोग्य आधार’ ॲप रुग्णांच्या सेवेत येणार आहे. या ॲपद्वारे रुग्णांना जवळचे धर्मादाय रुग्णालय, तिथे उपलब्ध असलेल्या सुविधा, उपलब्ध खाटांची संख्यांची माहिती तसेच तत्काळ खाट राखीव करता येणार आहे. वॉर रुम, आरोग्यदूत, धर्मादाय रुग्णालय आणि व्यवस्थापनाला यासंदर्भात माहिती एकाच वेळी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालुकास्तरावर आरोग्य सुविधेसाठी तालुका किंवा जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार जिल्हा रुग्णालय, कर्करोग रुग्णालय, केमोथेरपी डे-केअर सेंटर, रेडिओ थेरपी ट्रिटमेंट युनिटसाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले. तसेच नर्सिंग होम ॲपमध्ये रुग्णालय आणि डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची त्रयस्थ पडताळणी करण्यात यावी. पदवीच्या सत्यतेची तपासणी करण्यात यावी, असे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.

भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, महिला व बाल आरोग्य केंद्र यांची मोजणी करण्यात आली आहे. केवळ अंतर आणि जिल्हा यानुसार केंद्रांची मागणी न करता जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची मागणी करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले. बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरजकुमार, धर्मादाय आयुक्त श्री. महाजन यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Charitable Hospitals State Government Decision Transparency
Mobile App Arogya Aadhar Facilities

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत झाले हे निर्णय

Next Post

तब्बल १९ हजार पदांच्या भरती प्रक्रियेबाबत गिरीश महाजनांनी दिली ही महत्त्वाची माहिती

Next Post
girish mahajan e1641732816585

तब्बल १९ हजार पदांच्या भरती प्रक्रियेबाबत गिरीश महाजनांनी दिली ही महत्त्वाची माहिती

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011