इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तराखंड येथील गंगोत्री येथे दर्शनासाठी जात असताना गंगनानी येथे हेलिकॉप्टर कोसळून ६ भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर १ भाविक गंभीर जखमी आहे. जे एरो ट्रान्स कंपनी चे हेलिकॉप्टर असून यात ६ भाविक आणि १ पायलट असे एकूण ७ व्यक्ती प्रवास करीत होत्या. जखमींना डेहराडून येथील रुग्णालयात उपचार साठी दाखल करण्यात आल्याची माहिती नाशिकचे तानचे माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी दिली.
तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातात बरेली येथील राधा अग्रवाल, त्यांची मुलगी रुची अग्रवाल यांच्यासह ५ जण होते. राधा अग्रवाल या केमीकल इंजीनिअर असलेल्या रुचीबरोबर मुंबईत राहत होत्या. यातील इतर यात्री हे आंध्रप्रदेशचे असल्याचे सांगण्यात आले. हे हेलिकॉप्टर देहरादूनहून खरसाली येथे जात होते.