मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या ‘ त्या ‘ वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात मोठा राडा झाला, त्यानंतर राणे यांना अटक होऊन सुटका देखील झाली. आता पुन्हा एकदा राणे जन आशीर्वाद यात्रेसाठी कोकण दौऱ्यावर असून दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईत बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आले आहे.
वास्तविक शिवसेना आणि भाजपच्या या दोघां नेत्यांमध्ये सध्या विस्तवही देखील जात नसताना नेमकी काय चर्चा झाली ? त्यातच राणे यांच्या अटक नाट्यानंतर दोघांमध्ये काय गुप्तगू झाले ? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही वेगळी भेटी झाली आहे. या वेगळ्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्येच चर्चा झाली. सेना भाजपा वाद सुरू असतानाच दोन मोठ्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याने तर्कवितर्कांना एकच उधाण आले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड १० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या १५ मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही, तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बरीच चर्चा झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. राणेप्रकरणानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. तसेच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळण्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.