इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चांदवड जवळ असलेल्या राहुड घाटात शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. उषा मोहन देवरे (४५) ,रा. भारत नगर, मालेगाव असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात २० ते २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चांदवड येथून मालेगावच्या दिशेने जाणा-या कंटेनर चालकांचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते. या अपघातात तीन ते चार वाहन एकमेकांवर आदळले. यात एक बसही होती. या अपघातांमुळे वाहतुकीची कोंडी झाल्याने राहुड घाटात वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले होते.
पोलिसांनी तातडीने मदत करत काही तासात वाहतूक सुरळीत केली. या घाटात नेहमीच अपघात होत असतात. त्यात हा विचित्र अपघात झाला व त्यात एका महिलेचा मृत्यू झाला.
https://www.facebook.com/share/r/18gscmKYvE